`त्याने मला लग्न करून फसवलंय..` प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या पत्नीचे गंभीर आरोप
अभिनेता अविष्कार दारव्हेकर सध्या त्याच्या खाजगी आयुष्यामुळे बराच चर्चेत आला आहे.
मुंबई : अभिनेता अविष्कार दारव्हेकर सध्या त्याच्या खाजगी आयुष्यामुळे बराच चर्चेत आला आहे. त्याने अनेक मालिका, सिनेमांत काम केलं पण तो फारसा यशस्वी झाला नाही. प्रोफेशनल लाईफपेक्षा अभिनेता त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असतो. बिग बॉसमध्ये आल्यापासून तो आणि त्याची माजी पत्नी स्नेहा वाघ हे प्रकरण खूप गाजलं होतं. स्नेहाने त्याच्यावर लावलेला कौटुंबिक अत्याचाराचा गंभीर आरोप आणि त्यानंतर नवं लग्न केलं असताच सोशल मीडियावर त्याच्या आणखी एका लग्नाचा खुलासा झाला आहे.
बिग बॉसनंतर परत आविष्कारचं नाव काही फारसं समोर आलं नव्हतं. यातच आता त्याने दुसरं लग्न केल्याची बातमी कानावर पडली आहे. माहितीनुसार, त्याने स्नेहा वाघशी पहिलं लग्न केलं होतं. यानंतर आता त्याने दुसरं लग्न केलं होतं. यातच त्याच्या आणखी एका लग्नाचा सोशल मीडियावर खुलासा झाला आहे. स्मिता सावंत या महिलेनं सोशल मीडियावर खळबळजनक पोस्ट करत आविष्कार आपला पती असून त्याने आणखी एक लग्न करून आपल्याला फसवलं आहे असं तिने म्हटलंय. खरंतर आविष्काराने फेसबुकवर केलेल्या पोस्टवरून हि महिला त्याची खरोखरच पत्नी आहे असं सिद्ध होत आहे.
स्नेहा सावंत हिने फेसबूकवर पोस्ट शेअर करत आपण आविष्कारची दुसरी पत्नी असल्याचा दावा केलाय. सोबत याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान तिने त्याच्यासोबत लग्न झाल्याचा एक फोटो शेअर केलाय. यामध्ये आविष्कार तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना दिसलीय. या पोस्टमध्ये लिहिलं आहे कि, ''नमस्कार मी अवनी (स्मिता)…आविष्कारची पत्नी..आम्हाला एक ५ वर्षांचा मुलगा आहे. आविष्कारने मला ठरवून पूर्णपणे फसवलं आहे. आमचा घटस्फोट झालेला नसतानाही त्यानं या मुलीशी लग्न केलं आहे..ते ही मला कळू न देता.''
'त्या मुलीचे घरचे मला ओळखत होते. मी त्यांच्या घरी देखील गेले होते.. तरी देखील त्या मुलीच्या आणि याच्या घरच्यांनी मला पुर्णपणे आर्थिकदृष्ट्या लुटलं आहे. माझे दागिने विकले. माझ्या नावार खूप कर्ज करून ठेवलं. माझे, माझ्या आई वडिलांचे पैसे हवे तसे वापरले आणि आता त्याच्याकडे पैसे मागितले तर त्याने मला सांगितलं की कोर्टात जाऊन माग.
त्याच्या घरी गेले तेव्हा मला हातापाया पडायला लावलं. तरच पैसे देईन म्हणाला. त्या मुलीला विचारलं असता ती मला उलट बोलायला लागली. मारायला धावून आली अंगावर…' याविषयी अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र आता आविष्कार पुन्हा चर्चेत आलाय. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर त्याने कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही. आता या सगळ्यावर काय प्रकिक्रीया देतोय हे पाहणं औत्स्युक्याचं ठरणार आहे.