Avneet Kaur on working with Nawazuddin Siddiqui : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी 'टिकू वेड्स शेरू' या त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन आणि अवनीत कौर यांच्यात एक किसिंग सीन दाखवण्यात आला होता. तो सीन पाहून सगळ्यांनाच आश्चर्य झाले अनेकांनी त्यांना यावरून ट्रोल देखील केले. तर नवाजुद्दीन आणि अवनीत कौर हे दोघेही चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाचे प्रोडक्शन कंगना रणौतनं केलं आहे. दरम्यान, एका मुलाखतीत अवनीत कौरनं पहिल्यांदाच नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत स्क्रीन शेअर केल्यानंतर तिला कसं वाटलं ते सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अवनीत कौरनं या मुलाखतीत नवाजुद्दीन सिद्दीकीचे तोंडभरून कौतुक केले आहे. तिने नवाजुद्दीन बद्दल बोलताना सांगितले की त्याचे कामाबद्दलचे समर्पण आणि गांभीर्य हे खरंच प्रशंसनीय आहे. कलाकार या नात्याने, ऑन-स्क्रीन आणि ऑफ स्‍क्रीन अशा दोन्ही प्रकारे आमच्या कामाला घेऊन पूर्णपणे वचनबद्ध असण्‍याची गरज असते. तर पुढे नवाजसोबत स्क्रीन शेअर करताना कसा अनुभव आला हे सांगत तो खूप सुंदर होता असं म्हणतं अवनीत पुढे म्हणाली, "नवाज सरांचे त्यांच्या कामाबद्दलचे समर्पण आणि गांभीर्य वाखाण्याजोगे आहे. अभिनेता म्हणून आपण लक्ष केंद्रित करणे आणि समर्पित असणे आवश्यक आहे. जेव्हा एखादा अभिनेता पडद्यावर असतो, तेव्हा ते त्या क्षणी हजर असतात, नवाझुद्दीन अभिनयात त्यांचे 100% देतात आणि  ही गोष्ट आहे जी नवाज सरांकडून मी शिकले आहे आणि एक अभिनेता म्हणून माझ्या संपूर्ण प्रवासात मी ते माझ्यासोबत ठेवीन."


हेही वाचा : मॅनेजरनं 80 लाख रुपयांची फसवणूक करण्यावर Rashmika Mandana सोडलं मौन, म्हणाली...


दरम्यान, 'टिकू वेड्स शेरू' मध्ये अवनीत कौर आणि नवाजुद्दीन सिद्दीकी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेयर करताना दिसणार आहेत. त्यांच्या जोडीनं सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. तर नवाजुद्दीन बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असून अवनीतला त्याच्यासोबत स्क्रिन शेअर करताना पाहण्यासाठी अनेक लोक उत्साही आहेत. साई कबीर श्रीवास्तव दिग्दर्शित 'टिकू वेड्स शेरू' आहे.  या चित्रपटातून कंगना रणौत ही या चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. हा सिनेमा हे 23 जून म्हणजे आज पासून प्राइम व्हिडिओवर पाहता येणार आहे. अवनीतने बारा वर्षांपूर्वी बालकलाकार म्हणून मनोरंजन क्षेत्रातील पदार्पण केले होते. अवनीत ही सोशल मीडिया स्टार आहे. तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.