Ayesha Julka : 90 च्या दशकातील सिनेमा हे आजही प्रेक्षकांच्या पसंतीचे आहेत. त्यातून त्या काळातले हिरो आणि हिरोईन्सदेखील आजही चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवून आहेत. त्यातल्याच एक अभिनेत्री आहे त्या म्हणजे आएशा झुल्का. आएशा झुल्का या अभिनेत्रीने 90 चे दशक गाजवले आहे. मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान याच्यासोबत त्या 'जो जिता वोही सिंकदर' या चित्रपटातून दिसल्या होत्या. त्यानंतर त्यांनी 'खिलाडी' या चित्रपटातूनही प्रमुख भुमिका निभावली होती. पण त्यानंतर मात्र आजपर्यंत आएशा झुल्का फारश्या चित्रपटांतून समोर आल्या नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

90 च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी आएशा झुल्का सध्या काय करतात. हाही त्यांच्या चाहत्यांना पडलेला प्रश्न. आज (28 जूलै) आएशा झुल्का यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया आएशा झुल्का यांच्याविषयी...


आएशा झुल्का यांना लहानपणापासून चित्रपटातून काम करण्याची आवड होती. त्यामुळे त्यांना घरून खूप बोलणीही खावी लागत असे. तरी त्यांनी आपली आवड झोपासली आणि आपले शिक्षण पुर्ण केल्यानंतर 1990 साली त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. करिअरच्या सुरूवातीला त्यांनी तेलुगू चित्रपटातून काम केेले. त्यांचा पहिला हिंदी सिनेमा हा 'कुर्बान' हा होता ज्यात त्यांनी सलमान खानसोबत काम केले होते. 


2010 साली त्यांनी 'अदा' या चित्रपटात काम केले होते पण त्यानंतर त्या कुठल्याच चित्रपटातून फारश्या दिसल्या नाहीत. 1993 सालापासून त्यांनी चित्रपटसृष्टीत आपले काम कमी केले. 1993 साली आलेला दलाल या चित्रपटातून त्यांनी काम केले होते.  'जो जीता वही सिकंदर' 'दलाल', 'बलमा', 'वक्त हमारा है', 'जय किशन', 'अकेले हम अकेले तुम', 'मासूम', 'चाची 420', 'मुकद्दर', 'दंड नायक' 'हिम्मतवाला अशा काही चित्रपटांतून त्यांनी महत्त्वाच्या भुमिका केल्या आहेत. 



सध्या अभिनेत्री आएशा झुल्का यांनी बॉलीवूडमधून पुर्णविराम घेतला आहे. आता त्या तब्बल पाच कंपन्यांच्या मालकीण असून त्या आपल्या बिझनेझमधून करोडो संपत्तीच्या मालकीण ठरल्या आहेत. त्यांनी 2003 साली समीर वाशी यांच्याची विवाह केला. त्यानंतर आपल्या पतीच्या  Samrock Developers या कंपनीच्या त्या भागीदार झाल्या. ही कंपनी हॉस्पिटॅलिटी सर्व्हिस देते. आएशा झूल्का यांनी त्यांच्या पतीसह गोवामध्ये या कंपनीची एक ब्रान्च काढली असून त्यांच्या नावावर करोडोंचे हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स आहेत. त्याचा स्पा आणि ब्यूटीमध्ये बिझनेझ आहे. तसेच त्यांचा रिटेलिंगचाही एक बिझनेझ आहे. समोर आलेल्या रिपोर्टनूसार आएशा झुल्का यांचे net worth 84 करोडच्याही वर आहे. 


आएशा झुल्का यांना मध्यंतरी एक गंभीर दुखापत झाली होती त्यातून सावरून त्या आज आपला बिझनेस उत्तमरित्या सांभाळत आहेत.