Ayesha Takia Troll : बॉलिवूड अभिनेत्री आयशा टाकिया सुंदर अभिनेत्रींपैकी एक ओळखली जाते. शाहिद कपूरसोबत कॉम्प्लॅनच्या जाहिरातीत बालकाकार म्हणून झळकल्यानंतर आयशानं 'टारझन: द वंडर कार' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. अभिनेता वत्सल सेठसोबत ती या चित्रपटात दिसली होती. अजय देवगणची देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका होती. लग्नानंतर आयशा जरी फिल्मी दुनियेपासून दूर असली तरी सोशल मीडियावर तिची चांगलीच क्रेज आहे.  अलीकडेच आयशा टाकियाला पापाराझींनी विमानतळावर स्पॉट केलं होतं. मात्र हा व्हिडीओ पाहून त्यानंतर लोकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली.यावर चिडून आयशानं आता ट्रोल्सना सडेतोड उत्तर दिले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयशा टाकिया आझमी शुक्रवारी आपल्या मुलासोबत मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली. यादरम्यान, आयशाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले जे पाहून नेटिझन्सनं तिला आता ओळखता येत नसल्याचे सांगितलं. अनेकांनी प्लॅस्टिक सर्जरीनंतर तिचा चेहरा खराब झाला असल्याचं सांगून तिला ट्रॉल देखील केलं. सोशल मीडियावरील या ट्रॉलिंगनंतर आयशानं तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्रीच्या चेहऱ्याला प्लास्टिक म्हणणाऱ्यांना तिनं सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.



आयशानं एक पोस्ट शेअर करत लिहिले की,"प्रेम आणि शांती." असं कॅप्शन टाकत लिहिलं की, "लोक तुमची एनर्जी कशी घेतात यावर तुम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही. फक्त तुमचे काम प्रामाणिकपणे आणि शक्य तितक्या प्रेमाने करत राहा." तिचा या पोस्टची सध्या चर्चा सुरु असून अनेक लोक तिच्या या पोस्टचं  कौतुकही करत आहेत.


त्याशिवाय या सगळ्या प्रकरणावर तिनं स्पष्टीकरण देखील दिलं आहे. आयशा म्हणाली की हे सांगण्याची गरज आहे. दोन दिवस आधी मी गोव्याला गेले होते. कुटुंबात एक मेडिकल एमरजंसी होती. माझी बहीण खरंच रुग्णालयात होती. या सगळ्यात मला आठवतंय पापाराझींनी मला विमानतळावर थांबवले. काही फोटो क्लिक केले. पण जितकं मला कळंल त्या प्रमामए माझ्या दिसण्यावरून आणि चेहऱ्यावरून संपूर्ण देशात चर्चा सुरु आहे. फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यावर लोकं वेगवेगळ्या चर्चा करत प्रतिक्रियाही देत आहेत. मी कसं दिसायला हवं, तसं दिसायला नको. लूकवर कमेंट केली आहे. मला लोक काहीही बोलत आहेत. खरं सांगू तर कोणत्याही प्रकारे कोणताही चित्रपट करण्यासाठी किंवा कमबॅकची माझी इच्छा नाही. मी माझं आयुष्य आनंदानं घालवते आणि मला लाइमलाइटमध्ये यायचं नाही. त्यामुळे माझ्याविषयी चिंता करू नका.'


हेही वाचा : PHOTO VIRAL : रस्त्यावरच्या दुकानातून KGF स्टार यशनं खरेदी केली पत्नीसाठी आइस कॅन्डी आणि टॉफी


आयशाचा जन्म 10 एप्रिल 1986 रोजी मुंबईत झाला. आयशानं टाकियानं 2009 मध्ये सलमान खान विरुद्ध 'वॉन्टेड' या चित्रपटातील भूमिकेमुळे तिला ओळख मिळाली.