मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वॉन्टेड या सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्रीला धमकीचे फोन आले आहेत. यामुळे सगळीकडे जोरदार चर्चा रंगली आहे. अभिनेत्री आयशा टाकियाला फोनवर धमकी दिली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ती व्यक्ती आयशाला धमकी देत आहे की, ती आणि तिचा नवरा फरहाज आजमी लवकरच कारागृहात असतील. तसेच आयशाप्रमाणेच तिच्या सासूला आणि नणंदेला देखील असे धमकीचे फोन येत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2004 मध्ये आलेल्या 'Tarzam Wonder Car' सिनेमातून आयशाने डेब्यू केलं होतं. तर 2009 मध्ये समाजवादी पार्टीचे नेता अबू आजमी यांच्या मुलाशी फरहान आजमीशी आयशाने लग्न केलं. आयशा मुंबईला राहते. आरोप असा आहे की, काही दिवसांपूर्वी आयशाला धमकीचे फोन आले. फोन न उचलल्यामुळे सतत मॅसेज केले गेल. या धमक्यांमुळे आयशा आणि परिवार हैराण आहेत. 




द‍िल मांगे मोर, सोचा ना था, शादी नंबर 1, शादी से पहले, डोर, सलाम ए इश्‍क सारख्या सिनेमांमधू आयशाने वेगवेगळ्या भूमिका सादर केल्या आहेत. 2011 मध्ये आयशाचा शेवटचा मोड हा सिनेमा आला होता.