नवी दिल्ली : कित्येक वर्षांपासून अयोध्येतील सुरु असलेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जमीन हिंदूना देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्याचवेळी मुस्लिमांना पर्यायी जागा देण्याचा निर्णयही न्यायालयाने दिला आहे. तर मुस्लिमांना मशिदीसाठी वेगळी जमीन देण्यात येईल. याबाबत केंद्र सरकार तीन महिन्यात योजना आखेल आणि राम मंदिर बांधण्यासाठी सरकार ट्रस्ट तयार करेल. तर अयोध्येत महत्त्वाच्या ठिकाणी मशीद बनवण्यासाठी जागा दिली जाईल, असे न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यायालयाच्या या निर्णयानंतर राजकीय नेत्यांपासून बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. स्वागर्ताह ट्विट करत कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.


चित्रपट दिग्दर्शक मधुर भंडारकर यांनी, अयोध्या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निष्पक्ष निर्णयाचं स्वागत करतो. अखेर हा दिर्घकालीन प्रश्न सोडवण्यात आला, असं ट्विट करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 



  


बॉलिवूड अभिनेत्री कोयना मित्राने, 'क्या फैसला हे' असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.






बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरनेही ट्विट करत, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करण्याचं म्हटलं आहे.