मुंबईः इन्टाग्रामवरून सध्या बिकीनी लुक फार कॉमन होत आहे, ज्यात दिशा पटानीचा बिकीनी लुक सर्वात जास्त फेमस आहे. तिच्या अनेक फोटोंवर करोडोंच्या संख्येने लाईक्स आणि कमेंट्स येतात. त्यात आजकालच्या अभिनेत्रींनाही बिकीनी लुकचा चांगलाच सेन्स आला आहे. चाहते बॉलीवूड सेलिब्रेटींच्या या बिकीनी लुकवर घायाळ होत असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यात सध्या आघाडीची अभिनेत्री आणि दंगल फेम सान्या मल्होत्रा इन्टाग्रामवर भलतीच चर्चेत आहे, बॉलीवूडमध्ये जर कोणत्याही अभिनेत्रीला फॅशनमध्ये स्विमवेअर उत्तम सेन्स असेल तर ती अभिनेत्री आहे सान्या मल्होत्रा. ती सध्या तिच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करत आहे जो लवकरच रिलीज होणार आहे पण मनाने मात्र ती दुसरीकडेच कुठेतरी आहे असं खुद्द सान्याच म्हणतेय. सान्याने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे ज्यात ती प्रिंटेड बिकिनी बॉटम्ससोबत घालून एका स्विमिंग पूलावर उभी आहे. तिचा फोटो हा डार्क शेडचा आहे त्यामुळे तिच्या बिकिनीची रंग समजून येत नाहीये. ती ज्या ठिकाणी उभी आहे त्याच्या मागे, ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे सान्याने दिलेले कॅप्शनही भन्नाट आहे. "#mentallyimhere" असं कॅप्शन तिने दिलं आहे. 


सान्याच्या पूर्वीच्या स्विमसूट फोटोमध्ये एनिमल प्रिंट असलेली बिकिनी होती ज्यात ती खूपच सुंदर दिसत होती. जी तिने बरगंडी बॉटमसोबत घातली होती. तिच्या कुरळ्या केसांमुळे ती नेहमीच आकर्षक दिसते. 


तिने नुकत्याच पोस्ट केलेल्या पोस्टवर अभिनेता आयुष्यमान खुरानाने भन्नाट कमेंट केली आहे. तू तर इतकी वेगळी दिसत आहेस की तूला ओळखणेही कठीण झाले आहे. ''आप तो पहेचन में ही नहीं आये'', अशी कमेंट सान्याच्या पोस्टवर आयुष्यमान खुरानाने केली आहे. 'बधाई दो' या चित्रपटातून सान्या मल्होत्रा आणि आयुष्यमान खुराना एकत्र दिसले होते, तेव्हापासून दोघांमध्ये चांगली मैत्री असून ते दोघेही एकमेकांच्या फोटोवर कमेंट करत असतात. 


आयुष्यमानचा नुकताच 'अनेक' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.