मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि गायक आयुष्मान खुराना 14 सप्टेंबर रोजी आपला 34 वा वाढदिवस साजरा करतोय. आयुष्मान वयाच्या 17 व्या वर्षांपासून लाइमलाइटमध्ये आला होता. जेव्हा त्याने रिअॅलिटी शो 'पॉपस्टार' मध्ये कमी वयात स्पर्धकाच्या रुपात सहभागी झाला होता. छोटा पडदा ते मोठा पडदा असा आयुष्मानचा प्रवास अतिशय सुंदर होता. उत्कृष्ठ अभिनेत्याबरोबरच तो एक चांगला गायक म्हणूनही लोकप्रिय आहे. त्याच्या 'विकी डोनर' या सिनेमातील 'पानी दा रंग' हे गाणं लोकप्रिय आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या स्ट्रगलच्या काळात आयुष्मान खुराना कॉलेजच्या ग्रुपसोबत गोव्यात गेला. त्यावेळी आयुष्मानकडे ट्रिपकरता पुरेसे पैसे नव्हते. यामुळे त्याने ट्रेनमध्ये गाणं गायला सुरूवात केली. यावरून त्याने ट्रेनमध्ये गाणं गाऊन पैसे जमा केले. यानंतर तो सतत ट्रेनमध्ये गाणं गात असे आणि खर्चाचे पैसे काढत असे. आयुष्मान खुरानाचा डेब्यू सिनेमा 'विकी डोनर'हा 2012 मध्ये रिलीज झाला. या सिनेमांत आयुष्मान स्पर्म डोनर बनला होता. 2004 मध्ये आयुष्मानने स्वतः खऱ्या आयुष्यात स्पर्म डोनेट केले आहेत.  


आयुष्यमानचा लव्ह मॅरेज झालं आहे. आयुष्मानने ताहिराला प्रपोज केलं. तेव्हा ताहिराने मस्त उत्तर दिलं आहे. तेव्हा ताहिराने आयुष्मानला विचारलं की, तुला नक्की काय करायचं? यावर आयुष्मानने जे उत्तर दिलं त्यावर ताहिरा खूप हसली आणि लग्नाला होकार दिला. लग्नाच्यावेळी आयुष्मानकडे फक्त 10 हजार रुपये होते. 11 वर्षाच्या नात्यानंतर 2011 मध्ये लग्न केलं.