मुंबई : पुरस्कार विजेत्या लेखिका सुधा मूर्ती यांच्या दोन गोष्टी खास आहेत. एक दक्षिण भारतीय खाद्य आणि दुसरं म्हणजे अभिनेता आयुष्मान खुरानाचे सिनेमे. 'परोपकार हे जर अन्न असेल तर लिखाण हे ताटातील लोणच्याप्रमाणे' असल्याचं इन्फोसेसच्या संस्थापक सुधा मूर्ती यांनी बुधवारी एका कार्यक्रमात म्हटलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

65 वर्षांच्या इंजिनिअरींगच्या शिक्षिका असलेल्या सुधा मूर्ती वर्षाच्या 365 दिवस काम करत असतात. संस्थेचं कार्य सांभाळणाऱ्या सुधा मूर्ती जेव्हा त्यांना वाटतं तेव्हाच लिखाण करतात, असं त्यांनी या कार्य्रमात सांगितलं. इन्फोसेसच्या माध्यमातून सुधा मूर्ती या हेल्थकेअर, शिक्षण, सार्वजनिक स्वच्छता आणि महिला सक्षमीकरण या प्रश्नांवर काम करत आहेत. 


सुधा मूर्ती यांचा दिवस सकाळी 8 वाजता संस्थेच्या कार्यालयातून सुरू होतो. तसेच त्या एकही दिवस सुट्टी घेतल्यासं त्यांनी सांगितलं आहे. कारण सुट्टीची त्यांना गरज वाटत नसल्याचं त्या म्हणाल्या. एखादी गोष्ट मला लिहाविशी वाटली तरच त्या लिहितात. दररोज दोन ते तीन तास लिखाणं करणं मला जमत नाही. पण एकदा लिहायला बसलं तर ते संपवल्याशिवाय मी उठत नाही, असं सुधा मूर्ती म्हणाल्या. 


इंग्रजी आणि कन्नाडामध्ये लिहिणाऱ्या लेखिका सुधा मूर्ती यांनी कादंबरी, तांत्रिक पोस्टी, प्रवासवर्णन, लघुकथा आणि 9 बेस्टसेलर ठरलेली लहान मुलांच्या पुस्तकांच लेखन केलं आहे. 'अनेकदा मी अनुभवात आलेल्या गोष्टी लेखनातून मांडते. आणि मी फक्त आणि फक्त सत्य लिहिते. तसेच गोष्ट मांडण्याची कला अवगत असल्यामुळे त्याचा यामध्ये सहभाग असतो', असं सुधा मूर्ती कार्यक्रमात म्हणाल्या.