आयुष्मान खुरानानं स्वत: च्या वडिलांना म्हटलं हुकमशाह; लहाणपनीच्या Trauma ला आठवत म्हणाला, `बेल्ट आणि चप्पलनं...`
Ayushmann Khurrana on His Father : आयुष्मान खुरानानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Ayushmann Khurrana on His Father : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचा सध्या कोणता चित्रपट प्रदर्शित झालेला नसला तरी तो सोशल मीडियावर चर्चेत असतो. कधी तो त्याची मुलगी आणि पत्नीमुळे चर्चेत असतो तर कधी कोणत्या कार्यक्रमामुळे चर्चेत असतो. आता तो कोणत्या कार्यक्रमामुळे नाही तर त्याच्या वडिलांविषयी केलेल्या एका पोस्टमुळे चर्चेत आहे. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे. त्यानं यावेळी त्याच्या ट्रॉमाविषयी सांगितलं. ते त्याला बेल्ट आणि चप्पलनं मारायचे असं त्यानं सांगितलं आहे.
सध्या आयुष्मान हा त्याच्या म्यूजिकल बॅन्ड 'आयुष्मानभव' मुळे चर्चेत आहे. तो त्यासाठी तो सध्या अमेरिकी टूरवर आहे. इथेच दिलेल्या ऑनेस्टली सेइंग पॉडकास्ट या मुलाखतीत त्यानं त्याचं खासगी आयुष्य आणि प्रोफेशन्ल आयुष्याविषयी स्पष्टपणे वक्तव्य केलं आहे. म्युजिकवर असलेलं त्याचं प्रेम आणि जवळीकचा देखील उल्लेख केला आहे.
सुरुवातीला वडील होण्याविषयी बोलत आयुष्मान म्हणाला 'मी 20 वर्षांचा होतो तेव्हा वडील झालो. खरंतर विकी डोनर प्रदर्शित होण्याआधीच मी वडील झालो होतो. हा पूर्णपणे एक वेगळाच अनुभव होता. मी आणि ताहिरा दोघं एकत्र मोठे झालो कारण आम्ही खूप कमी वयात आई-वडील झालो.'
मुलीच्या जन्माविषयी बोलताना आयुष्मान म्हणाला, जेव्हा पासून त्यांच्या आयुष्यात मुलीचं आगामन झालं आहे तेव्हापासून त्याच्या आयुष्यात इतके बदल झाले आहेत त्याविषयी त्यानं सांगितलं. आयुष्मान म्हणाला, 'सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की मला एक मुलगी आहे. तुम्ही एक चांगली व्यक्ती होतात. दुसऱ्यांच्या भावनांना चांगल्या पद्धतीनं समजून घेण्यासाठी मुली मदत करतात.'
हेही वाचा : कश्मीरा शाहचा लॉस एंजिल्समध्ये झाला गंभीर अपघात; रक्तानं माखलेल्या कपड्यांचा फोटो शेअर करत म्हणाली...
पुढे त्यानं सांगितलं की 'मी खूप वेगळा वडील आहे. माझे वडील तर हुकूमशाह होते. चप्पल, बेल्ट वगैरेनं मारायचे. त्यांच्यासाठी असं काही करणं अगदी सोपी गोष्ट होती आणि त्यामुळे मला लहाण असताना मेंटल ट्रॉमा देखील झाला होता. एक दिवसतर मी पार्टीवरून परत येत होतो तर माझ्या शर्टातून सिगारेटची दुर्गंधी येत होती. मी माझ्या वडिलांच्या भीतीनं कधीच त्याला हात लावला नव्हता, पण तरी सुद्धा फक्त वास येत होता म्हणून मला मारलं होतं.'