सलमान खानची जागा घेणार आयुष्मान; तीच जादू अनुभवता येणार का?
आयुष्मान खुराना सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. आयुष्मानच नाव सलमान खानशी जोडलं गेलं आहे. त्याला कारण काय?
बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुराना चित्रपट निर्माते सूरज बडजाता यांच्या पुढील कौटुंबिक रोमँटिक सिनेमामध्ये दिसणार आहे. सूरज बडजात्या यांचा नवीन सिनेमातील 'प्रेम'ची भूमिका साकारण्यासाठी आयुष्मान खुराना सज्ज झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता चित्रपटाच्या स्क्रिप्टने खूप प्रभावित झाला असून बडजाता यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे. जो 'हम आपके है कौन' आणि 'हम साथ साथ है' सारखे हिट आणि क्लासिक चित्रपटासाठी ओळखले जातात.
पिंकव्हिला मधील एका अहवालानुसार, बडजाता ज्यांनी यापूर्वी सलमान खान, शाहिद कपूर आणि सोनू सूद यांना त्यांच्या चित्रपटांमध्ये सुसंस्कृत प्रेमाची आवड म्हणून कास्ट केले होते. ते त्यांच्या आगामी कौटुंबिक सिनेमासाठी नवीन चेहरा शोधत होते. कौटुंबिक प्रेक्षकांमध्ये मजबूत आकर्षण असलेल्या अभिनेत्याच्या शोधात त्यांनी या भूमिकेसाठी आयुष्मान खुरानाची निवड केली.
या प्रकल्पाशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, "सूरज जी एका अभिनेत्याला कास्ट करू इच्छित होते ज्याची प्रतिमा कौटुंबिक प्रेक्षकांशी जोडली जाऊ शकते आणि मोठ्या पडद्यावर नवीन युगातील प्रेमाची भूमिका साकारण्यासाठी आयुष्मान खुरानापेक्षा कोण अधिक चांगला असू शकतो. या दोघांची जोडी क्लिक झाली आहे. सूरज बडजाता त्याच्या पुढच्या चित्रपटात निर्माण करत असलेल्या जगावर आयुष्मानने प्रेम केलं आहे."
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज यांच्या म्हणण्यानुसार, आयुष्मानमध्ये प्रेममधील सर्व गुण योग्य प्रमाणात आहेत. त्यामध्ये असलेली निरागसता आणि अट्रॅक्शन आहे. रिपोर्टनुसार, सुरज बडजात्या यांनी आतापर्यंत सिनेमाच्या लीड रोलकरिता कोणत्या अभिनेत्रीला साइन केलंलं नाही. सध्या आता ते इतर कलाकारांना एकत्रित करण्यास मग आहेत. या अनटायटल्ड प्रोजेक्टच शुटिंग 2025 मध्ये उन्हाळ्यात होणार आहे.
या दरम्यान आयुष्मान खुराना देखील प्रोड्युसर दिनेश विझान यांचा हॉरर कॉमेडी 'थामा' नावाची प्रेम कहाणी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आयुष्मान या सिनेमाक एका भूताच्या भूमिकेत दिसणार आहे.