बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप सध्या आपल्या आगामी 'शर्माजी की बेटी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान या चित्रपटाच्या निमित्ताने ताहिरा कश्यपने समाजात रुढवण्यात आलेल्या एका रुढीवर आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. कशाप्रकारे कुटुंबातील जबाबदारींच्या जागी करिअरला प्राधान्य दिल्यास महिलांना दोषी भासवलं जातं यावर ताहिरा कश्यपने भाष्य केलं आहे. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत तिने या विषयावर बोलताना मनातील सल बोलून दाखवली. ताहिरा कश्यप ही आयुष्मान खुरानाची पत्नी असून त्यांना दोन मुलं आहेत. यावेळी तिने कशाप्रकारे आपण एकदा मुलांऐवजी कामाला प्राधान्य दिलं याची आठवण सांगितली. 


"पुरुषांनाही दोषी दिला पाहिजे"


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

“माझी त्यादिवशीच या विषयावर चर्चा सुरु होती. आपण एखाद्या महिलेला मुलं असल्यास तिला तू हे सर्व कसं काय सांभाळतेस असं विचारत असतो. माझी खूप इच्छा आहे की, इतर पुरुष आणि आयुष्मानलाही हा प्रश्व विचारायला हवा की, घऱी 2 मुलं असताना तुम्ही शूटवर कसे काय जाता? 3 चित्रपटांचं शुटिंग करायला कसं काय जमतं? फक्त महिलाच नव्हे तर पुरुषांनाही या सर्वांबद्दल दोषी ठरवलं पाहिजे," असं ताहिरा कश्यप म्हणाली आहे. 


'पुरुषांना नेमकं कसं घडवलं जातं हे मला जाणून घ्यायचं आहे'


“महिलांना अशाप्रकारे घडवलं जातं की, त्यांना त्यांच्या मुलांपेक्षा त्यांचं काम निवडण्याबद्दल नेहमीच दोषी वाटते. मी माझ्या मुलांच्या PTA च्या जागी मीटिंग निवडली होती. मी अशा कठीण निवडी केल्या आहेत. मला आठवतं की त्या दिवशी माझी एक कॉन्फर्नस होती आणि माझ्या मुलाचा संगीत नाटकातील पहिला परफॉर्मन्सही त्याच दिवशी होता. मला तो चुकवावा लागला. पण, सुदैवाने, त्यांच्या त्या थिएटरचे तीन शो होते, त्यामुळे मला त्यापैकी एकाला जाता आलं. त्यामुळे कोणी कितीही दाखवले तरी अपराधीपणा कायमच असतो. मला फक्त हे जाणून घ्यायचे आहे की पुरुष कसे घडवले जाते. आणि हे प्रश्न त्यांना वारंवार विचारले पाहिजेत कारण वरवर पाहता त्यांना दोषी वाटत नाही," अशी खंत ताहिरा कश्यपने मांडली आहे. 


आयुष्मान खुराना आणि ताहिरा कश्यप यांचे 1 नोव्हेंबर 2008 रोजी लग्न झाले. त्यांनी मुलगा विराजवीर आणि मुलगी वरुष्का अशी दोन मुलं आहेत.