मुंबई : दिवाळीच्या निमित्तानं काही गोष्टी ओघाओघानंच येतात. नातेसंबंधांमध्ये येणारा गोडवा हा त्यातीलच एक. कामाच्या निमित्तानं कुटुंबाशी फार वेळ व्यतीत करण्याची संधी मिळत नाही. पण, दिवाळीच्या दिवसांमध्ये मात्र हे सारे बहाणे चालतच नाहीत. कारण, हेच ते दिवस असतात जेव्हा कुटुंबात वयाच्या भींती ओलांडून सारेच बेभान होऊन सणवारांचा आनंद घेतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या दिवाळीनं हेच सारं दाखवलं. मागच्या वर्षी कोरोनामुळं आनंदाला आळा घातला गेला होता. यंदा मात्र परिस्थिती काहीशी सुधरताना दिसली. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या घरी सुरु असणारं दिवाळी सेलिब्रेश सर्वांच्या भेटीला आणलं. 


बच्चन असो, वा कपूर; प्रत्येक सेलिब्रिटीच्या घरी दिवाळीचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. अभिनेता आयुष्मान खुराना आणि त्याची पत्नी ताहिरा कश्यप यांच्यासाठीही ही दिवाळी अतिशय खास होती. 


ताहिरानं दिवाळीतील अशाच काही रमणीय क्षणांपैकी एकाची झलक सोशल मीडियावर पोस्ट केली. जिथं तिनं सासऱ्यांसोबत ढोलच्या ठेक्यावर ताल धरला आणि थिरकण्यास सुरुवात केली. 




Coolest Father in law अशा शब्दांत तिनं सासऱ्यांचा उल्लेख केला. दिवाळीच्या या उत्सवातील ही छटा नेटकऱ्यांच्या चेहऱ्यावरही हसू आणून गेली. ताहुिरानं शेअर केलेल्या या व्हिडीओला अनेक सेलिब्रिटींनीही लाईक केलं असून, त्यावर कमेंटही केल्या आहेत.