मुंबई : 'बाहुबली : द कन्क्लूजन'फेम अभिनेता पी सुब्बाराजूचं नाव एका ड्रग रॅकेटमध्ये समोर आलंय. यामुळे तमिळ सिनेमा इंडस्ट्रीत जोरदार खळबळ उडालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी सुब्बाराजू याच प्रकरणात 'एक्साइज अॅन्ड प्रोहिबिशन डिपार्टमेंट'च्या स्पेशन इन्व्हेस्टिगेशन टीमसमोर (SIT) हजर झालाय. यावेळी, अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे ड्रग्ज रॅकेट आणि संबंधित गोष्टींवर चौकशी केली. उल्लेखनीय म्हणजे 'बाहुबली २'मध्ये पी सुब्बाराजू 'कुमार वर्मा'च्या भूमिकेत दिसला होता.


तेलुगु फिल्म इंडिस्ट्रीशी निगडीत १२ लोकांना SIT नं समन्स धाडलेत. १९ जुलै रोजी दिग्दर्शक जग्नाध SIT समोर हजर झाले होते. त्यांचीही तब्बल १० तास चौकशी सुरू होती. २० जुलै रोजी सिनेमेटोग्राफर श्याम के नायडू यांचीही ६ तास चौकशी सुरू होती. 


हैदराबादमध्ये काही आठवड्यांपूर्वी LSD आणि MDMA सारखे हार्ड ड्रग्ज सापडलेत. या प्रकरणात पोलिसांनी १५ ड्रग तस्करांना अटक केली होती. या आरोपींकडे तेलुगु सिनेसृष्टीतील जवळपास २५ जणांचे संपर्क आणि फोन रेकॉर्डस सापडले. शिवाय व्हॉटसअप संभाषणही समोर आलं.