व्हिडिओ: `बाहुबली` आणि `कटप्पा`चा दमदार डान्स पाहून तुम्ही व्हाल खूश
आपल्यापैकी अनेकांना उत्सुकता असेल की, बाहुबली आणि कटप्पा जर एकत्र आले तर, कसा डान्स करतील. तुमच्या कल्पनेला प्रत्यक्षात उतरवले ते टीव्हीवर प्रसारीत होणाऱ्या एका रिअॅलिटी शोने.
मुंबई: 'बाहुबली द बिगनिंग' आणि 'बाहुबली द कनक्लूजन' या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली. दोन्ही चित्रपटातील गाण्यांनीही जोरदार लोकप्रियता मिळवली. इतकी की, अनेक स्टेज शो, कार्यक्रम, टीव्ही चॅनल शो यांमधून आपल्याला या गाण्याची झलक पहायला मिळते. पण, चित्रपटाबाबत बोलायचे तर दोन्ही चित्रपटांमधे गाण्यांचा समावेश असूनही बाहुबली आणि कटप्पा एकत्र नाचताना दिसले नाहीत. म्हणूनच आपल्यापैकी अनेकांना उत्सुकता असेल की, बाहुबली आणि कटप्पा जर एकत्र आले तर, कसा डान्स करतील. तुमच्या कल्पनेला प्रत्यक्षात उतरवले ते टीव्हीवर प्रसारीत होणाऱ्या एका रिअॅलिटी शोने.
अॅण्ड टीव्हीवर प्रसारीत होणाऱ्या 'हाय फिव्हर डान्स का नया तेवर' या स्टेज शोमद्ये बाहुबली आणि कटप्पा एकाच व्यासपिठावर एकत्र आले. ते नुसते एकत्र आले नाहीत. तर, त्यांनी एकत्र मिळून डान्सही केला. अर्थातच हे गाणे होते बाहुबली चित्रपटातीलच. आणि या गाण्यावर शानदार नृत्य करणारे कलाकार आहेत या कार्यक्रमाचे स्पर्धक सूरज आणि आकाश.
आज (शनिवार) रात्री ९.३० वाजता प्रसारित होणाऱ्या या बागात सूरज झाला आहे कटप्पा आणि आकाश झाला आहे बाहुबली. पहा या नृत्याची ही एक शानदार झलक.