मुंबई : बाहुबलीच्या नावाने लोकप्रिय असलेला अभिनेता प्रभास याचा 23 ऑक्टोबर रोजी वाढदिवस. प्रभास आता आपला 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. प्रभास याचं संपूर्ण नाव प्रभास राजू उप्पालापाटि. पण तो प्रभास याच नावाने लोकप्रिय आहे. बाहुबलीनंतर आता प्रभास या सिनेमात दिसणार आहे. तो लवकरच अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबत साहो या सिनेमात दिसणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रभास एकावेळेला फक्त एकच सिनेमा करतो. महत्वाचं म्हणजे त्याच्या प्रत्येक सिनेमाचं शुट हे 600 दिवस चालतं. 1500 करोड कमावणाऱ्या बाहुबली या सिनेमाचं शुटिंग तर 5 वर्षे सुरू होतं. या दरम्यान त्याला अनेक मोठ्या सिनेमांच्या ऑफर आल्या पण त्याने त्या नाकारल्या. 


प्रभासने 'ईश्वर' या तेलगु सिनेमातून डेब्यू केला होता. त्यानंतर राघवेंद्र, वर्षम, योगी, एक निरंजन, रेबेल, बाहुबली : द बिगिनिंग आणि बाहुबली : द कन्क्लूजन सारख्या सिनेमात तो दिसला. साहो ही त्याची पहिली बॉलिवूड फिल्म आहे. प्रभासने आतापर्यंत 19 सिनेमे केले आहेत. 


दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी बाहुबली या सिनेमाने प्रभावित होऊन आपल्या आगामी सिनेमात पद्मावतमध्ये प्रभासला रतन सिंहचा रोल ऑफर केला होता. प्रभास त्यावेळी बाहुबली 2 च्या शुटिंगमध्ये व्यस्त होता. प्रभासने या सिनेमासाठी नाही म्हटलं. 


महत्वाचं म्हणजे गेल्या 5 वर्षांत बाहुबलीचं शुटिंग करताना त्याने 6 हजारहून अधिक मुलींना नाकारलं आहे. प्रभास हिंदी सिनेमांचा खूप मोठा चाहता आहे त्याने आमीर खानचा '3 इडिएट्स' हा सिनेमा जवळपास 20 वेळा पाहिला आहे. 


बाहुबली या सिनेमाकरता प्रभासला 1.5 करोड रुपये किंमतीचे जीम इक्विपमेंट्स सिनेमाच्या निर्मात्याने गिफ्ट केले आहेत. ते प्रभासला एका खास रुपात बघू इच्छित होते. ज्यामुळे त्याला वजन वाढवायचं होतं आणि जाडं दिसायचं होतं. बाहुबली या सिनेमाकरता त्याला 25 करोड रुपये मिळाले होते. आता प्रभास एका सिनेमाकरता 30 करोड रुपये आकारतात.