COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : 'बाजी' या झी मराठीच्या नव्या मालिकेच्या कालच्या एपिसोडची सुरुवात शेराला आलेल्या एका खलित्याने झाली. दरम्यान बाजी मंदिराबाहेर आपल्या शिपायांना डोळ्यात तेल घालून पहारा ठेवा असे सांगत असतो कारण गादी रोवण्याच्या सोहळ्यासाठी खुद्द छोटे पेशवे सरकार गणेश मंदिरात येणार असतात. दुसरीकडे कोतवाल शेराला चिंतामणी हार चोरणे म्हणजे स्वतःवर संकट ओढवण्यासारखे आहे असे सांगतो. पण शेरा कोतवालाला शंभर दिवसात पेशवा बनण्याचे आमिष दाखवतो. व भूर्जपत्र मिळविण्याचे आदेश देतो.


दुसऱ्या दिवशी हिराबाई बाजींपुढे येते. तेव्हा बाजी हिराबाईंना विचारतात आपलं मन कुठं रमलंय हे सांगा. पण त्यावरही खोडकरपणे उत्तर देऊन हिरा तिथून निघून जाते. दरम्यान शेरा आपल्या सहकाऱ्याला रात्री गावच्या बाहेरील विठ्ठल मंदिराच्या दीपकानावर मशाल जाळण्याचे आदेश देतो व देवीला प्रार्थना करण्यासाठी मंदिरात जातो. काही वेळाने शेराचा सेवक गावाबाहेरील विठ्ठल मंदिराच्या दीपदानावर मशाल पेटवतो आणि शेरा देवीच्या मंदिरातून गुप्त रस्त्याने भुयारात शिरतो. पुढे गेल्यावर एका अनामिक आवाजाने शेरा मध्येच थांबतो परंतु ती व्यक्ती कोण असते याचा काही त्याला थांग लागत नाही. परंतु असे गुप्तपणे पुणे जिंकण्यासाठी लागेल ती मदत करू असे शेराला सांगून एक खलिता शेरापुढे टाकला जातो.


ज्यात तलावातल्या गणेश मंदिरातील चिंतामणी हार चोरावे असे लिहिलेले असते. ते शेराला मिळताच जेव्हा लागेल तेव्हा हवी ती मदत करू असे सांगून त्या अनामिक व्यक्तीचा आवाज बंद होतो. शेराला मिळालेल्या खलित्यामध्ये मंदिराच्या सुरक्षेची सर्व माहित असते. देवीच्या मंदिरातील भुयारात मिळालेल्या अज्ञात व्यक्तीच्या सांगण्यावरु शेरा गणपती मंदिरातील चिंतामणी हार चोरण्यास यशस्वी होईल का? हे पाहण्यासाठी बाजी या मालिकेचा पुढील एपिसोड आवर्जून बघा, अगदी ना चुकता.