बाजी | `बादशहा इंग्रजांना सांगतो, पेशवाला शनिवार वाड्यातच`
बाजी या झी मराठीच्या नव्या मालिकेच्या पहिल्या एपिसोडची सुरुवात मराठ्यांविरोधात कटकारस्थान आखण्यासाठी आलेल्या इंग्रज आणि बादशहा यांच्या संभाषणाने झाली.
मुंबई : बाजी या झी मराठीच्या नव्या मालिकेच्या पहिल्या एपिसोडची सुरुवात मराठ्यांविरोधात कटकारस्थान आखण्यासाठी आलेल्या इंग्रज आणि बादशहा यांच्या संभाषणाने झाली. बादशहा इंग्रजांना सांगतो पेशवा मोठा होण्याआधीच त्याला शनिवार वाड्यात ठार केलं पाहिजे. नाहीतर पुढे जाऊन तो आपल्याच उरावर बसू शकतो. त्याबरोबर यावेळी फक्त पुण्यावर चढाई न करता संपूर्ण मराठा साम्राराज्यावरच चढाई करायची आहे.
पण ते करणार कोण असा प्रश इंग्रज अधिकारी विचारताच बादशाहा अजगर समशेरचे नाव सांगतो. दुसऱ्या दिवशी घरोघरी दान मागणारा वासुदेव गाणे गात येतो. दरम्यान गणपतीच्या मंदिरापुढे थांबलेल्या मेण्याला झिडकारणाऱ्या शिलेदाराला मेण्यातून आवाज येतो, कलकीबाई मायेनं जग जिंकता येतं असं म्हणतात, जरा मायेनं बोलावं माणसानं असं बोलत बोलत हिराबाई मेण्यातून बाहेर पडतात.
हिराबाई गणपतीच्या दर्शनाला पुढं जात असताना रावसाहेब करड्या नजरेने हिराबाईंकडे करड्या नजरेने बघत असल्याचे कालकीबाई म्हणजे हिराबाईंचा छबू मामा हिला कळते म्हणून थोडे पुढे गेल्यावर संकटाच्या काळजीने नडीपल्याड गणपतीच्या दर्शनाला न जाण्याचा सल्ला हिराबाईंना देतो. दरम्यान नौकेची वाट बघत असणाऱ्या हिराबाईंची नजर नदीपल्याड कुणाचातरी शोध घेत असते.
काही वेळाने नौका येताच हिराबाई, कालकीबाई नौकेत बसतात आणि तेवढ्यात जबरदस्तीने रावसाहेबही नौकेत शिरतात आणि नौका सुरु होते. गणपतीचे दर्शन करत असताना कालकीबाई हिराबाईंना अचानक सांगतात खरंच देव पावला, आता तुमच्या नजरेची भरभिर थांबणार बहुदा. हे ऐकताच हिराबाई मागे वळून कुणाचातरी शोध घेऊ लागते. परंतु कुणीच नजरेस पडत नाही. तेवढ्यात कालकीबाई हिराबाईंना म्हणते की, मोठं मोठे धनिक व पंचहजारी सरदार तुझ्यावर जीव ओवाळून टाकायला तैयार आहेत आणि तुझा जीव एका साध्या शिलेदारात गुंतलाय. यावर हिराबाई म्हणतात पंचपक्वानांपेक्षा कांदा भाकरी गोड लागते आम्हांला.
बाजीचा शोध घेत निघालेल्या हिराबाईंना मध्येच सरदार खंडेरावांच्या भाचा म्हणजे रावसाहेब अडवतो आणि कुविचाराने हिराबाईंच्या अंगावर जाऊ लागतो. तेवढ्यात तिथं खुद्द बाजी येतात आणि रावसाहेबाचा चांगला समाचार घेतात. घडल्या प्रसंगाचा सूड घेईन असे सांगून रावसाहेब निघून जातात. हे पाहून गावकरी बाजींचे कौतुकाचे गोडवे गाऊ लागतात.
दरम्यान दादाजी बाजीसाठी कुणाचातरी निरोप घेऊन येतात पण, हिराबाई पुढं बाजीचं कौतुक करताना पंचाला मारलेली निरोपाची गाठ विसरूनच जातात. मदतीला धावून आलेल्या बाजीला हिराबाई खोडकरपणे सतावून आल्या पावली मागे धाडतात, आम्हाला कुणाच्या मदतीचं मुळीच गरज नाही.
काही वेळाने दादाजींना निरोपाची खून आठवते व ते बाजीला सांगतात, चिमणाजींनी तुम्हाला कोतवालीत बोलावले आहे. हे ऐकताच बाजी व दादाजी कोतवालीकडे जायला तडक निघतात तेवढ्यात त्यांना एक अज्ञात व्यक्ती धडकून जाते. त्याला हटकून निघणार एवढ्यात बाजीला दादाजींच्या अंगावर विंचू दिसतो. तो झटकून बाजी विचार करू लागतो की, हा विंचू दादाजींच्या अंगावर कसा आला? दुसरीकडे इंग्रज समशेरच्या भेटीला येतात आणि त्याचा जहरीपणा पाहून भारावून जातात. समशेर पुण्यावर चढाई करण्याची तैयारी करायचे आदेश देतो. समशेरचा हा मनसुबा पूर्ण होईल का?