मुंबई : दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी याच्या ‘बापजन्म’ या मराठी सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट २९ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिन खेडेकर आणि पुष्कराज चिरपूटकर यांच्यासह ‘बापजन्म’ चित्रपटात शर्वरी लोहोकरे, सत्यजित पटवर्धन आणि आकाश खुराणा यांच्या भूमिका आहेत. 


मुलगा आणि त्याचे वडील या विषयावर अनेक चित्रपट आतापर्यंत आले आहेत पण निपुणने त्याच्या या चित्रपटात हे नाते अगदी वेगळेपणाने साकारले आहे. जो माणूस संवेदनशील नाही त्याच्या संवेदनांबद्दल काही बोलणे हे कठीण काम असते. आम्ही सर्वांनी हे आव्हान पेलण्याचा प्रयत्न केला आहे. निपुण हा आजच्या पिढीचा लेखक आणि दिग्दर्शक आहे. या चित्रपटात त्याने त्याची सर्जनशीलता खूप चांगल्या पद्धतीने साकारली आहे, अशा शब्दांत यावेळी सचिन खेडेकरने निपुणचे कौतुक केले.



‘बापजन्म’ची कथा, पटकथा आणि संहिता निपुण धर्माधीकारीनेच लिहीली आहे. तो म्हणतो, 'सचिन खेडेकर यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाबरोबर दिग्दर्शक म्हणून माझ्या पहिल्याच चित्रपटात काम करण्याची संधी मिळणे हे मी माझे भाग्य आणि सन्मान मानतो. त्यांचे केवळ सेटवर असणेही आम्हा सर्वांसाठीच अगदी प्रोत्साहनात्मक होते.'