मुंबई : ज्येष्ठ रंगकर्मी बाबा पार्सेकर यांचा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्काराने गौरव करण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतल्या प्रबोधनकार नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमात सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ज्येष्ठ रंगकर्मी लीलाधर कांबळी यांच्या हस्ते बाबा पार्सेकर यांचा खास गौरव करण्यात आला. तर ज्येष्ठ गायिका निर्मला गोगटे यांना संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. 


ज्येष्ठ रंगकर्मी रजनी जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संगीत नाटकांना पुन्हा एकदा चांगले दिवस येण्यासाठी प्रसंगी नाट्यगृह विनाशुल्क उपलब्ध करून देण्याचा सरकार विचार करत असल्याचं यावेळी विनोद तावडे यांनी सांगितलं.