Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून एलाॅन मस्कला (Elon Musk) ओळखले जाते. आता एलाॅन मस्क ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे नवे मालक बनले आहेत. एलाॅन मस्क यांनी 44 अब्ज डॉलरमध्ये ट्विटरची (Twitter) मालकी मिळवली. बॉलिवूड क्वीन कंगना रनौत (Kangana Ranaut) ही तिच्या बोल्ड विधानांमुळे नेहमीच चर्चेत असते. एलाॅन मस्क हा ट्विटरचा नवीन मालक झाल्यामुळे कंगना रनौतचे निलंबित ट्विटर खाते पुन्हा सक्रिय होईल अशी आशा ती व्यक्त करत आहे. कंगना रनौत ने इंन्सनग्रामला पोस्ट शेअर करत सांगितले की, तिला तिच्या ट्विटर वरील मित्रांची खूप आठवण येत आहे. तिचे अनेक चाहते तिनं ट्विटरवर परत यावं याकरिता मिम्स शेअर करत आहेत. (Baba Vanga before Kangana Ranaut had made a prediction on Twitter nz)


हे ही वाचा - ...अन् हुमा कुरेशीनं लगावली सोनाक्षी सिन्हाच्या कानशिलात, Video आला समोर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


 


तुम्हाला माहितच असेल की, बंगाल विधानसभा निवडणूकीच्या निकाला दरम्यान कंगना रनौतने अनेक आक्षेपार्ह पोस्ट ट्विटरहून केले होते. त्यामुळेच ट्विटरने मागील वर्षी कंगना रनौतला कायमचे निलंबित केले. असे सांगण्यात आले होते की, ट्विटरच्या नियमांचे पालन न केल्यामुळे हेटफुल कंडक्ट पॉलिसी आणि एब्यूजिव पॉलिसी या अंतर्गत कंगना चे अंकाऊट निलंबित करण्यात आले होते. 


त्याचवेळी, एलाॅन मस्कने ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर लगेचच त्यांनी पराग अग्रवालसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना ट्विटरहून काढून टाकले आहे. कंगनाने ती विजयी झाल्याची घोषणा तिच्या इंन्सटग्रामवर केली. तिनं इंन्सटग्रामला एक स्टोरी शेअर करत सांगितले की, तिनं या गोष्टीची भविष्यवाणी खूप आधी केली होती. कंगनाने  पूढे लिहिले की, "मी नेहमी भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचा अंदाज लावते... काही लोक माझ्या दूरदृष्टीला एक्स-रे म्हणतात, काहीजण याला माझा शाप म्हणतात आणि काही लोक याला जादूटोणा म्हणतात...


हे ही वाचा - Elon Musk यांनी ट्विटर विकत घेण्यासाठी 44 अब्ज डॉलर्स कसे उभे केले?


 


 


अभिनेत्रीने पुढे लिहिले, "भविष्याचा अंदाज लावणे सोपे नाही, त्यासाठी खूप निरीक्षण कौशल्य आणि मानवी अंतःप्रेरणेचे स्पष्टीकरण आवश्यक आहे तिनं ट्विटर वर परत यावे याकरिता तिचे चाहते वेगवेगळे मिम्स तयार करत आहेत. अभिनेत्रीनं तिच्या इंन्सनग्राम स्टोरीला मिम्स संदर्भातील अनेक सक्रीनशॉट देखील शेअर केले आहेत.


हे ही वाचा - Elon Musk Twitter Deal : एलॉन मस्क यांच्याकडे ट्विटरचा ताबा, CEO Parag Agrawal ना पदावरून हटवण्याच्या निर्णयानं हादरा


 


 


त्याचवेळी एलाॅन मस्क यांनी सांगितले की, कोणती खाती पूर्ववत करायची हे ठरवण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल,. ते म्हणाले, “ट्विटर विविध दृष्टिकोनांसह परिषद स्थापन करेल. त्या परिषदेच्या बैठकीपूर्वी कोणताही मोठा सामग्री निर्णय किंवा खाते पुनर्संचयित होणार नाही.