Babita Phogat on Dangal Movie : माजी कुस्तीपटू आणि भाजप नेत्या बबिता फोगाट यांच्या कुटुंबावर आधारीत 'दंगल' हा चित्रपट सगळ्यांनी पाहिला आहे. या चित्रपटात आमिर खाननं महत्त्वाची भूमिका साकारली होती. तर या चित्रपटात गीता आणि बबीता या बहिणींनी त्यांच्या स्ट्रगल आणि त्यासोबत त्यांनी देशाचं नाव कसं उंचावलं हे देखील दाखवलं आहे. या चित्रपटामुळे खरंच फोगाट कुटुंबाला नेहमी मिळणाऱ्या ओळखीत आणि लोकप्रियतेत वाढ झाली. मात्र, आता याच चित्रपटावरून बबितानं एका मोठा खुलासा केला आहे. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 2000 कोटींची कमाई केली. तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल की या चित्रपटासाठी फोगाट कुटुंबाला फक्त एक कोटी रुपये मिळाले. त्याचा खुलासा बबीता फोगाट यांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बबीता फोगाटनं 'न्यूज 24' ला दिलेल्या मुलाखतीत तिनं सांगितलं की दंगल या चित्रपटानं वर्ल्डवाइड 2000 कोटींची कमाई केली आणि त्यातून एक कोटीच फक्त फोगाट कुटुंबाला मिळाले. त्यानंतर जेव्हा तिला विचारण्यात आलं की त्यामुळे ती किंवा कुटुंब हे निराश झाले होते का? तर बबीतानं सांगितलं की नाही, माझ्या वडिलांनी एक गोष्ट सांगितली की लोकांचं प्रेम आणि सन्मान हवं. 23 डिसेंबर 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले होते. या चित्रपटात आमिर खाननं फक्त महावीर फोगाट यांची भूमिका साकारली नव्हती तर त्यासोबत तो या चित्रपटाचा सह- निर्माता होता. यात महावीर फोगाट यांचा प्रवास आणि त्यांना मुलगा झाला नाही म्हणून त्यांनी मुलींचा कुस्तीपटू कसं बनवलं याविषयी सगळं दाखवलं आहे. त्याशिवाय देशासाठी कसं त्या मुलींनी मेडल पटकावले. 


हेही वाचा : मनीष मल्होत्राच्या पार्टीत शाहीदनं चुकून घातला मीराचा ड्रेस? व्हिडीओ पाहून नेटकरी बुचकळ्यात, म्हणाले...


बबीता फोगाटचं कुस्ती करियर हे खूप चांगलं राहिलं. त्यानं 2010 मध्ये राष्ट्रकुल खेळांमध्ये रौप्य पदक पटकावलं आणि 2014 मध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये स्वर्ण पदक पटकावलं. 2012 मध्ये वर्ल्ड कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकलं. 2016 च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतही भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. पण त्यांना पदक मिळालं नाही. 2019 मध्ये बबिता यांनी कुस्तीला निरोप दिला आणि राजकारणात प्रवेश केलं.