मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मामधील बबिताजी म्हणजेच मुनमुन दत्ता नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे खूप चर्चेत असते. मुनमुन दत्ता बिग बॉस 15 मध्ये एंट्री घेणार आहे अशी चर्चा आहे. मुख्य  म्हणजे  बबिता जीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर याची हिंट दिली असून त्यासोबत एक व्हिडिओही तिने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मुनमुन दत्ता ग्लॅमरस स्टाईलमध्ये दिसत आहे आणि ती या अनोख्या पद्धतीने बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार का? याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडिओ शेअर करत मुनमुन दत्ताने लिहिलं आहे की, ''आज रात्री बिग बॉसच्या घरात स्पेशल अपियरेंस/चैलेंज. नवीन वर्षाच्या शुभेच्छा.' तिच्या या व्हिडिओवर चाहते खूप कमेंट करत आहेत. एका चाहत्याने अशी कमेंट केली आहे की, 'तारक मेहता का उल्टा चष्मा हा शो सोडला का?' 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


टीव्ही अभिनेत्री मुनमुन दत्ताने 2004 मध्ये 'हम सब बाराती' या मालिकेतून इंडस्ट्रीमध्ये एंट्री घेतली होती. आणि त्यानंतर 2008 मध्ये ती 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये बबिताजीच्या भूमिकेत दिसली होती. या भूमिकेमुळे तिला इतकी लोकप्रियता मिळाली की, तिला आता बबिता जी म्हणून ओळखलं जातं. टेलिव्हिजनशिवाय तिने चित्रपटांमध्येही हात आजमावला आहे. तिने 'मुंबई एक्स्प्रेस', 'हॉलिडे' आणि 'ढिनचॅक एंटरप्राइज'  सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.