मुंबई : अभिनेता अक्षय कुमार स्टारर 'बच्चन पांडे' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सध्या सर्वत्र सिनेमाच्या ट्रेलरची चर्चा आहे. ऍक्शन, कॉमेडीची भन्नाट मेजवानी म्हणजे 'बच्चन पांडे' सिनेमा, असं म्हणायला हरकत नाही. अक्षयने सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. सिनेमाच्या माध्यमातून अक्षय एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांच्या मनात सिनेमाविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रेलरची सुरुवात मायरा देवेकर म्हणजे अभिनेत्री क्रती सेननने होते. मायराला बच्चन पांडे नावाच्या गँगस्टरवर सिनेमा तयार करायचा असतो. सिनेमा तयार करण्यासाठी तिचा मित्र विशू तिची मदत करतो. तर बच्चन पांडे हा एक क्रुक गँगस्टर असतो. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)


आता नक्की सिनेमा कसा असणार आहे याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. 3 मिनिटं 41 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये अ‍ॅक्शन, कॉमेडी आणि धम्माल पाहायला मिळत आहे.


सिनेमात क्रती आणि अक्षय शिवाय अरशद वारसी, प्रतीक बब्बर, संजय मिश्रा आणि पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.