मुंबई : 'बचपन का प्यार मेरा भूल नही जाना रे' या गाण्याच्या माध्यमातून घरा घरात पोहोचलेल्या सहदेव दिरदो (Sahdev Dirdo) बाबत अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. सहदेव दिरदोचा मोठा रोड अपघात झाला आहे. या अपघतात सहदेव गंभीर जखमी झाला आहे. सहदेवच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अपघातानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये गंभीर जखमी झालेला सहदेव दिसत आहे. सहदेवच्या डोक्याला जबर मार लागला आहे. त्यामुळे त्याला ऍम्ब्युलन्समध्ये शिफ्ट केलं जात आहे. 



या बातमीमुळे सहदेवचे सर्व चाहते दु:खी झाले आहेत. या व्हिडिओमध्ये सहदेवला अॅम्ब्युलन्समध्ये हलवले जात असून तो बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसत आहे. सहदेव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, लोक त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.


सहदेववर पूर्ण उपचार केले जातील, असे आश्वासन छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या आश्वासनानंतर सहदेवला जगदलपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले आहे. सहदेव यांची प्रकृती सध्या कशी आहे याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.



सहदेव काही दिवसातच गाण्यामुळे लोकप्रिय झाला. त्याच्या गाण्याने सगळ्यांचच लक्ष वेधलं आहे. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील सहदेवच्या या गाण्याने सोशल मीडियावर चांगलीच धुमाकूळ घातला. 



याच कारणामुळे त्याला 'इंडियन आयडॉल 12' या रिअॅलिटी शोमध्ये बोलावण्यात आले होते. सहदेवच्या व्हिडिओमुळे तो इतका लोकप्रिय झाला की छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही त्यांची भेट घेतली होती आणि गाणे ऐकले होते. छत्तीसगडचे नाव उज्ज्वल करण्यासाठी त्यांनी सहदेव यांना शुभेच्छा आणि अभिनंदनही केले होते.