मुंबई : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात राहणारा सहदेव दिर्दो, 'बसपन का प्यार' या गाण्याने आजकाल सोशल मीडियावर खूप लोकप्रिय झाला आहे. बॉलिवूड आणि पंजाबी गायक बादशाहनेही बुधवारी 'बसपन का प्यार' गाणं रिलीज केलं आहे. बादशाहसोबत आस्था गिलनेही या गाण्याला आवाज दिला आहे. सहदेव दिर्डो रातोरात स्टार बनला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बसपन का प्यार गाणं अजूनही लोकप्रिय आहे
सहदेवचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही व्हिडिओ पाहण्यात खरे वाटत असले तरीही काही व्हिडिओ बनावटही आहेत. असं सांगितलं जात आहे की, एमजी कंपनीने सहदेवला 23 लाख किमतीची कार भेट दिली आहे. मात्र हे खरं नाही. जर मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला गेला तर एमजी कंपनी खुश झाली आणि सहदेवला 21 हजारांचा चेक दिला.


एमजी कंपनीने ही भेट दिली
एमजी कंपनीच्या प्रवक्त्याने आपल्या निवेदनात असंही म्हटलं आहे की, त्यांच्या कंपनीने सहदेवला कोणतीही कार भेट दिली नाही, तर त्याला 21 हजार रुपयांनी सन्मानित केलं. इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्याला 5 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तो व्हिडिओ बघितल्यावर असं दिसत आहे की, सहदेवला भेट म्हणून 23 लाख किमतीची कार मिळाली, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल देखील या गाण्याच्या प्रेमात पडले आणि त्यांनी सहदेवला त्यांच्या निवासस्थानी आमंत्रित केलं, जिथे सहदेवने बसपन का प्यार हे गाणं गायलं.


अशी आहे सहदेवची लाईफस्टाईल
सहदेव दिरडोचे वडील शेतकरी म्हणून काम करतात आणि त्यांच्या घरात टीव्ही-मोबाईल सारख्या महागड्या वस्तू नाहीत. आजूबाजूच्या लोकांकडून गाणी ऐकल्यानंतर त्याने आपल्या शाळेत हे गाणं गायलं होतं. आणि अचानक हे गाणं व्हायरल झालं. जेव्हा मोठा झाल्यावर सहदेवला विचारण्यात आलं की, त्याला काय व्हायचं आहे, तेव्हा त्याने सांगितलं की त्याला गायक व्हायचं आहे.