मुंबई : प्रत्येक चाहत्याला आपला आवडता स्टार हा परफेक्ट आहे, असे वाटते. पण अनेकांना माहित नसते की त्यांच्यातही काहीतरी कमी आहेच. कारण स्टार्स देखील माणसंच आहेत. आणि त्याच्यातही चांगले वाईट गुण आहेत. काही स्टार्स तर टॉयलेटला गेल्यावर फ्लश करायला विसरतात तर काही महिनामहिनाभर अंघोळ करत नाहीत. तर काहीजण घरात, बाथरुममध्ये बुट घालून वावरतात. तर जाणून घेऊया आपल्या लाडक्या स्टार्सच्या काही विचित्र सवयी...


सुष्मिता सेन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री सुष्मिता सेनच्या उणीवांबद्दल जेव्हा केव्हा बोलले जाते तेव्हा तिची मद्यपान आणि धुम्रपानाची सवय अधोरेखित होते. पण तिची अजून एक विचित्र सवय आहे ती म्हणजे मोकळ्या छताखाली अंघोळ करायला आवडते. अंघोळ करताना तिला आकाश बघणे आवडते. यासाठी तिने आपल्या घरात खास व्यवस्थाही केली आहे. ती रोज खुल्या छताखाली अंघोळ करते.


शाहरुख खान


बॉलिवूडचा किंग खानच्या सिगरेट ओढण्याच्या सवयीची कायम चर्चा होत असते. पण यापेक्षाही एक विचित्र सवय शाहरुखला आहे. ती म्हणजे त्याला सुटबूट मध्ये कायम टिपटॉप राहायला आवडते. त्यामुळे घरात असतानाही तो बूट काढत नाही. पूर्ण घरात आणि बाथरुममध्येही तो तसाच वावरतो.


जितेंद्र


आपल्या खास शैलीतील नृत्यामुळे तरुणींची मने जिंकणारा अभिनेता जितेंद्रला बाथरुममध्ये जावून खाण्याची सवय आहे. तो जसे टॉयलेटमध्ये जातो तसे काहीतरी घेऊन जातो आणि तिथेच बसून खातो.


जॉन अब्राहम


जॉनला सतत पाय हलवण्याची वाईट सवय आहे. त्याच्या या सवयीमुळे शूटिंगमध्ये अनेक रिटेक्स घ्यावे लागतात.


शाहीद कपूर


बॉलिवूडचा चॉकलेट हिरो शाहीद कपूर कधीतरीच सिगारेट पितो पण कॉफी वारंवार पितो. सतत कॉफी पिण्याची सवय असलेला शाहीद जराही कॉफीपासून दूर राहू शकत नाही. कॉफीपासून दूर राहिल्याने त्याला बैचेन वाटते.