मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीला आज कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. तिने आपल्या अभिनयातून खूप नाव कमावलं आहे. ती आज लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करते. तिने सिनेसृष्टीत एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्याचबरोबर, आता तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ते पाहून चाहते तिच्या धाडसाचं कौतुक केलं जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिल्पा शेट्टीने केला योगा 
शिल्पा शेट्टीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती योगा करताना दिसत आहे. योगासने सुरू करण्यापूर्वी अभिनेत्री म्हणाली, 'पाय तुटला आहे पण हिंम्मत नाही. योगा से ही होगा' व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शन लिहिलं आहे की,  '10 दिवसांच्या विश्रांतीनंतर मला समजलं की स्ट्रेचिंग न करण्याचे कोणतंही कारण नाही.'


'पाय तुटला पण हिंम्मत नाही'
पुढे अभिनेत्री म्हणाली की, मला दुखापत झाली आहे पण मी नियमित व्यायाम करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानंतर मी पाश्र्वकोणासन आणि भारद्वाजसन योगासने पूर्ण केली. एवढंच नाही तर शिल्पाने पाठदुखीवर रामबाण उपाय सांगितला आहे. ती म्हणाली की, 'ज्याला जमिनीवर बसता येत नाही तो खुर्चीवर बसून या भागांसाठी आसने करू शकतो. स्नायू मजबूत करण्यासाठी हे फायदेशीर आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


शिल्पाचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्याला पाहून चाहते प्रतिक्रिया देत आहेत. वर्कफ्रंटवर बोलायचं झालं तर, अभिनेत्री रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलिस फोर्स' या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. आणि त्याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिचा पाय मोडल्याने तिला ब्रेक घ्यावा लागला. सध्या, चाहते तिची अशी अवस्था पाहून चिंता व्यक्त करत आहेत.  तिला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत आणि ते तिला लवकरात लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत.