मुंबई : 'मिस्टर एक्स इन बॉम्बे', 'मदर इंडिया', 'सन ऑफ  इंडिया ' अशा अनेक चित्रपटांच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात घर केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री कुमकुम यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८६व्या वर्षी त्यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. कुमकुम यांच्या निधनाची बातमी नावेद जाफरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वात शोककळा पसरली आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. कुमकुम यांनी १०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. शिवाय त्यांचे अनेक चित्रपट हिट देखील झाले आहे. किशोर कुमार आणि गुरू दत्त यांच्यासोबत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आगे. 



वाईट गोष्ट म्हणजे २०२० साली बॉलिवूडने अनेक दिग्गज कलाकार गमावले आहेत. अभिनेता इरफान खान, ऋषी कपूर, सुशांत सिंह राजपूत, जगदीप आणि आता  अभिनेत्री कुमकुम यांच्या निधनामुळे कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे.