मुंबई : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री तापसी पन्नू स्टारर 'बदला' सिनेमा  सध्या यशाच्या शिखरावर आहे. सिनेमाने पहिल्याच दिवशी ५ कोटी रूपयांपर्यंत मजल मारली. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात सिनेमाने बॉक्स ऑफिसवर उत्कृष्ट  कमाई केली. पण क्रिकेट सामण्याचे पडसाद सिनेमाच्या गल्लावर पडताना दिसले. प्रदर्शनानंतर सिनेमाने एकूण २७ कोटी रूपयांचा गल्ला जमवला आपे. ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी सिनेमाची कमाई सोशल मीडिच्या माध्यमातून शेअर केले आहेत. ट्विटर आदर्श यांनी सिमेमाच्या कमाईचा आकडा जारी केला आहे. 'बदला' सिनेमाने अमिताभ बच्चनच्या 'पिंक' आणि '१०२' सिनेमाला मागे टाकले आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


  
सिनेमात अमिताभ बच्चन हे बादल गुप्ताची भूमिका साकारत आसून तापसी नयना सेठीच्या भूमिकेत दिसत आहे. एका रहस्यमय घटनेवर आधारित सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 


'रेड चिली एन्टरटेन्मेट' बॅनरखाली निर्मित केला आहे. 'बदला' सिनेमा 2016 रोजी प्रदर्शित झालेल्या 'कॉन्ट्राटिएम्पो' या स्पॅनिश सिनेमाची रिमेक आहे. सिनेमात अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसत असून अभिनेत्री अमृता सिंग सुध्दा मुख्य भूमिकेत झळकत आहेत.