मुंबई : राम कपूर (ram kapoor) हे नाव कलाजगतासाठी नवं नाही. अभिनय क्षेत्रात आपल्या कलेच्या बळावर प्रसिद्धीझोतात आलेल्या या अभिनेत्यानं 'बड़े अच्छे लगते हैं' (bade Acche lagte hai) या मालिकेतून लोकप्रियतेचं शिखर गाठलं. खासगी आयुष्यामुळंही राम कायमच चर्चेत राहिला. जिच्यासोबत स्क्रीन शेअर केली, तिलाच पुढे रामनं आयुष्यभराची जोडीदार म्हणून निवडलं. (bade Acche lagte hai fame Actor ram kapoor love story with wife gautami gadgil)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गौतमी गाडगीळ (Gautami) या अभिनेत्रीशी रामनं लग्न केलं. पण, तो तिचं पहिलं प्रेम नव्हता. त्याच्याआधी ती एका करमर्शियल फोटोग्राफरच्या प्रेमात होती.  मधुर श्रॉफ असं त्या फोटोग्राफरचं नाव. ज्याच्याशीच तिनं लग्नही केलं. पण, काही काळानंतर लगेचच आपला हा निर्णय योग्य नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि या नात्याला तडा गेला आणि घटस्फोटानं नात्याला पूर्णविराम मिळाला. 


'घर एक मंदिर' (Ghar Ek Mandir) या मालिकेच्या सेटवर राम आणि गौतमीची पहिली भेट झाली होती. या कार्यक्रमात गौतमी रामच्या वहिनीच्या भूमिकेत झळकली होती. राम ज्या गौतमीला मालिकेमध्ये वहिनी म्हणत होता तिलाच त्यानं जोडीदार म्हणून निवडलं. 


एकमेकांचे परस्पर विरोधी स्वभाव असतानाही राम आणि गौतमी एक परफेक्ट कपल ठरले. 2003 मध्ये त्यांनी सर्व भूतकाळ मागे टाकत एका नव्या नात्याची सुरुवात होती. (Ram Kapoor Gautami wedding) राम- गौतमी विवाहबंधनात अडकले आणि त्यांच्या आयुष्यात नवं पर्व सुरु झालं.