मुंबई : अनेकदा मालिकांध्ये चौकटीबाहेरची कथानकं साकारण्याच्या नादात असा काही गोंधळ घातला जातो की पाहणारेही चक्रावून जातात. सध्या, असंच काहीसं एका लोकप्रिय मालिकेसोबत घडत आहे. ज्यामध्ये एक असं दृश्य साकारलं गेलं, जे पाहून नेटकरी, प्रेक्षकही चक्रावले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरे यांचं काय चाललंय, अशीच प्रतिक्रिया अनेकांनी दिली. ही मालिका आहे, 'बडे अच्छे लगते है... 2'. मागील काही दिवसांपासून या मालिकेमध्ये प्रिया आणि रामममध्ये काही कारणावरून वाद सुरु असल्याचं पाहायला मिळालं. 


या भागामध्ये एका कंडोमच्या पाकिटाची बरीच चर्चा झाली. यामध्ये दोघांचा सुरु असणारा संवाद कुठच्याकुठे जातो आणि त्यातच कंडोमच्या ब़ॉक्सची एंट्री होते. 


राम म्हणजेच अभिनेता नकुल मेहता, प्रियाला समजवण्याचा प्रयत्न करतो. पण तितक्यातच प्रिया कंडोमचं पाकिट समोर आणते आणि ते पाहून त्याचीही भंबेरी उडते. 



या मालिकेच्या चाहत्यांनी या व्हिडीओच्या बऱ्याच चर्चा केल्या आहेत. पण, तिथं काही नेटकऱ्यांनी मात्र ही काय डोकेदुखी आहे, असं म्हणत मालिकेची मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवल्याचं पाहायला मिळत आहे. 


दुहेरी अर्थ असणारे संवाद पाहून, अरे काय चाललंय यांचं... अशा शब्दांत मालिकेवर निशाणा साधला. मुख्य म्हणजे काहीतरी नवं सादर करण्याच्या नादात मालिकांचं हे फसलेलं गणित पाहून यावेळी कपाळावर हात मारणाऱ्यांचीच संख्या जास्त होती.