मुंबई : 'बड़े अच्छे लगते हैं 2' (Bade Achhe Lagte Hain 2) ही मालिका प्रदर्शित झाल्या दिवसापासून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहे. फक्त चाहतेच नव्हे, तर काही कलाकारांच्याही आवडत्या मालिकांच्या यादीत बड़े अच्छे लगते हैं 2' (Bade Achhe Lagte Hain 2)चं नाव येत आहे. या मालिकेवर सध्या चिंतेचं सावट आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण, मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणारा अभिनेता नकुल मेहता याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Nakuul Mehta Hospitalised)


अभिनेत्यावर शस्त्रक्रिया 
अचानकच प्रकृती खालावल्यामुळं नकुलला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्या क्षणापासून त्याच्या चांगल्या प्रकृतीसाठी चाहते प्रार्थना करत असल्याचं पाहायला मिळत आहे. 


नकुलवर हल्लीच एक लहान शस्त्रक्रिया करण्यात आली, ज्यानंतर त्यानं मालिकेतून काही दिवसांसाठी ब्रेक घेतला. सध्या त्याची प्रकृती स्थिर असली तरीही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तो आराम करत आहे. 


नकुल मालिकेच्या सेटवर पुन्हा केव्हा परतणार ही माहिती अद्यापही समोर येऊ शकली नाही. पण, चाहते मात्र त्याच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करताना दिसत आहेत. आता नकुलची प्रृती स्थिर असून तो लवकरच यातून सावरेल अशी आशाही व्यक्त करण्यात येत आहे. 



39 वर्षीय नकुलनं 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'प्यार का दर्द है, मीठा-मीठा प्यारा-प्यारा' या मालिकेमध्ये झळकला होता. मुंबई विद्यापीठातून वाणिज्य शाखेतून पदवी घेणाऱ्या नकुलनं कलाजगतात त्याची वाट निवडली. अभिनयासोबतच मॉडेलिंग आणि म्युझिक व्हिडीओमध्येही तो झळकला.