Bade Miyan Chhote Miyan : ट्रेलरमध्ये अक्षय आणि टायगरवर भारी पडला साउथचा ‘हा’ अभिनेता
Bade Miyan Chhote Miyan Movie Trailer : अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या `बडे मियां छोटे मियां` चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सगळीकडे त्याचीच चर्चा सुरु आहे.
Bade Miyan Chhote Miyan Movie Trailer : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या 'बडे मियां छोटे मियां' या अॅक्शन चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. ते दोघं एकत्र येणार म्हणजे जबरदस्त अॅक्शन पाहयला मिळणार. अखेर आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
ट्रेलरमध्ये अक्षय आणि टायगर हे देशाला आतंकवादी हल्ल्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. ट्रेलरच्या सुरुवातीला हॅलिकॉप्टर आणि आर्मीच्या गाड्या दिसतात. त्यानंतर बॅकग्राऊंडला एका खतरनाक अशा शत्रूचा आवाज येतोय, हा शत्रू मृत्यूला देखील घाबरत नसतो. त्यांच्या या शत्रूचं ना नाव आहे नाही काही ओळख आहे. या शत्रूचं फक्त एकच लक्ष आहे आणि ते म्हणजे सूड घ्यायचा आहे. त्यानंतर एक मोठा धमाका होता आणि गाड्या एखाद्या खेळण्यासारख्या उडू लागतात. तू कोण आहेस असं एक ऑफिसर त्या मास्क लावून असलेल्या माणसाला विचारतो तर तो बोलतो मी प्रलय आहे. ओव्हरऑल 3 मिनिट 32 सेकंदाचा हा ट्रेलर जबरदस्त आहे आणि त्याला पाहिल्यानंतर नेटकरी त्याची प्रतिक्षा करु शकत नाही आहे.
पृथ्वीराज खलनायकाच्या भूमिकेत
दाक्षिणात्य अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. 'बडे मियां छोटे मियां' चित्रपटात त्याची खलनायकाची भूमिका आहे. कबीर हा एक टेक जिनियस दाखवण्यात आला आहे. विज्ञान हे त्याचं शस्त्र आहे. कबीरची भूमिका फक्त एका खलनायकाची नाही तर त्याच्याकडे असलेल्या सगळ्या पावर्स या सूपरविलेनच्या आहेत. पृथ्वीराजच्या लूकविषयी बोलायचे झाले तर त्यानं काळ्या रंगाचा चांमड्याचा ड्रेस परिधान केला आहे. तर त्याचा चेहरा मास्कनं झाकल्यात आलं आहे. हा चित्रपट पुढच्या महिन्यात ईदच्या निमित्तानं 10 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा : 'आई कुठे काय करते' मधील 'हा' लोकप्रिय कलाकार आता ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत
या भूमिकेतूनही पृथ्वीराजचा लूक लपवण्यात आला आहे. पण ट्रेलर पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की निर्मात्यांना त्याची भूमिका ही सरप्राइज फॅक्टर ठेवायची आहे. टायगर आणि अक्षय यांच्यासोबत या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर आणि अलाया एफ महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात या सगळ्यांच्या हटके भूमिका पाहायला मिळणार आहे. तर अली अब्बास जफर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन आहे.