चेन्नई : चित्रपट बाहुबली : द कन्कूजन मध्ये बाहुबलीची भूमिका पार पाडणारा दक्षिणेतला सुपर स्टार प्रभासचा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. प्रभासचे फॅन्स या फोटोला नव्या चित्रपटाचा लूक असल्याचं मानत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाहुबली सिनेमात प्रभासने बाहुबलीची भूमिका पार पाडली. प्रभासच्या फॅन्सने हा फोटो शेअर करण्यात आला आहे, यात प्रभास क्लीन शेव्ह लूकमध्ये दिसतोय. 


बाहुबली सिरिजमध्ये ५ वर्ष समर्पित केल्यानंतर, प्रभास आता साहो या सिनेमात दिसणार आहे. दक्षिण भारतातील निर्देशक सुजीत यांच्या 'साहो' सिनेमाचं शुटिंग सुरू झालं आहे.


या व्हायरल फोटोत प्रभास फ्लाईटमध्ये बसला आहे, प्रभासने काळी टोपी आणि चष्मा घातला आहे. 


मात्र हा फोटो जुना आहे किंवा नवा, याबाबत काहीही स्पष्ट होऊ शकलेलं नाही, फोटोखाली लोक प्रतिक्रिया देत आहेत, प्रभासने क्लीन शेव का केली, त्यांना प्रभास बाहुबलीच्या लूकमध्ये पाहायला आवडतो.


याआधीही बाहुबली २ साठी प्रभास हेअरस्टायलिस्ट अलीम हाकिम यांच्याकडे आपला मेकओव्हर करण्यासाठी गेले होते. या मेकओव्हरनंतर असं सांगितलं जातं की, प्रभासने ५ वर्षानंतर मेकओव्हर केलं.