`बाहुबली` सिनेमाला `या` सिनेमाचा रेकॉर्ड तोडण्यात अपयश
गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांनाच याडं लावलेल्या `बाहुबली` सिनेमाला बॉलिवूडमधील एका सिनेमाचा रेकॉर्ड तोडण्यात अपयश आलं आहे.
नवी दिल्ली : गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांनाच याडं लावलेल्या 'बाहुबली' सिनेमाला बॉलिवूडमधील एका सिनेमाचा रेकॉर्ड तोडण्यात अपयश आलं आहे.
बॉलिवूड सिनेमांमधील सुपरहीट सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणजेच 'बाहुबली' हा सिनेमा. या सिनेमाने सर्वच प्रेक्षकांना याडं लावलं होतं. मात्र, 'बाहुबली' सिनेमाला एका बॉलिवूड सिनेमाचा रेकॉर्ड तोडता आला नाहीये हे तुम्हाला माहिती आहे का? नाही ना. काळजी करू नका आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत याचसंदर्भात...
बॉलिवूडमधील सुपरहीट सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणजेच 'जय संतोषी मॉ'. या सिनेमाची तुलना २०१७ साली रिलीज झालेल्या 'बाहुबली' सिनेमासोबत केली तर तुम्हाला कळेल की 'जय संतोषी मॉ' या सिनेमाची कमाई बाहुबली सिनेमापेक्षा कित्येक पटीने अधिक होती.
लवकरच रिलीज होणार असलेल्या 'बाबूमोशाय बंदूकबाज' या सिनेमातील ४८ सीन्स हे सेन्सर बोर्डाने कापले. याचसंदर्भात अभिनेत्री बिदिता बाग हिला विचारल्यावर ती म्हणाली की, "आजच्या काळात 'जय संतोषी माँ' या सिनेमासारखे सिनेमा बनल्यास कोण पाहणार" मात्र, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, 'जय संतोषी मॉ' हा बॉलिवूडमधील असा एक सिनेमा आहे ज्याचा रेकॉर्ड अद्याप कुठलाही सिनेमाने तोडलेला नाहीये.
बजेटपेक्षा १०० पटींने अधिक केली होती कमाई
'जय संतोषी मॉ' सिनेमाने आपल्या बजेटपेक्षा १०० पटींने अधिक कमाई केली होती. 'बाहुबली' सिनेमाने आतापर्यंत अनेक रेकॉर्ड्स केले आहेत. मात्र, १९७५ साली रिलीज झालेल्या 'जय संतोषी मॉ' सिनेमाचा रेकॉर्ड तोडता आलेला नाहीये. 'जय संतोषी मॉ' सिनेमाने आपल्या बजेटपेक्षा १०० पटींने अधिक कमाई केली होती आणि बाहुबली या सिनेमाला ते करता आलेलं नाहीये. 'जय संतोषी मॉ' सिनेमाचं बजेट ५ लाख रुपये होतं आणि सिनेमाने ५ कोटी रुपयांची कमाई केली होती.
२ हिट सिनेमांसोबत होती टक्कर
१९७५ साली 'जय संतोषी मॉ' या सिनेमासोबत 'शोले' आणि 'दिवार' हे सिनेमा रिलीज झाले होते. मात्र, असे असले तरीही या दोन्ही सिनेमांचा 'जय संतोषी मॉ' सिनेमाच्या कमाईवर काहीही परिणाम झलेला नाहीये. हा सिनेमा लहान मुलं, स्त्रीयांसोबतच पुरुषांच्याही पसंतीस पडला होता. या सिनेमात अनीता गुहा, कनन कौशल, भारत भूषण आणि आशिष कुमार यांनी प्रमुख भूमिका केली होती.