मुंबई : साऊथ फिल्म इंडस्ट्रिमधील प्रसिद्ध अभिनेता सत्यराज यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. सत्यराज यांना बाहुबली सिनेमामुळे बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख मिळाली. कटप्पा म्हणून घराघरात पोहोचलेल्या सत्यराज यांनी कोरोना विरुद्धची लढाई यशस्वीपणे जिंकली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कटप्पा म्हणून ओळखले जाणारे सत्यराज यांचा काही दिवसांपूर्वी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांनी प्रकृती खालवल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर चेन्नईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. 


 नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार सत्यराज कोरोनावर मात केली आहे. रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज मिळाला असून ते घरी परतले आहेत. त्यांनी याबाबत ट्वीट करून आपल्या चाहत्यांना माहिती दिली. कोरोनावर मात केल्याचं कळताच चाहत्यांनाही आनंद झाला आहे.


सत्यराज म्हणाले की, 'मित्रांनो...काल रात्री रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला, ते घरी परतले ते पूर्णपणे बरे आहेत आणि काही दिवसांच्या विश्रांतीनंतर कामावर परततील. तुम्हा सर्वांच्या प्रेम, आशीर्वाद आणि समर्थनासाठी खूप आभार.'


सत्यराज यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांनी स्वत:ला होम क्वारंटाइन केलं होतं. मात्र प्रकृती खालवल्याने रुग्णालयात दाखल करावं लागलं. ते तमिळ फिल्ममधील सुपरस्टार म्हणून ओळखले जातात. 1978 मध्ये त्यांनी आपल्या करियरची सुरुवात सत्तम एन कईइल फिल्मपासून केली होती. 



सत्यराज यांनी बराच काळ प्रोडक्शन मॅनेजर म्हणून देखील काम केलं आहे. बाहुबली सिनेमामध्ये त्यांनी कटप्पा ही महत्त्वाची भूमिका निभावली होती. बाहुबली को किसने मारा? कटप्पाने बाहुबली को क्यों मारा, असे अनेक प्रश्न आणि त्यावरचे जोक्स आजही फिरतात. 


बाहुबली 2 च्या निमित्ताने या प्रश्नांची उत्तर मिळाली खरी मात्र जोक्स आजही त्यावर होताना दिसतातय आज घराघरात बाहुबलीमधील कटप्पा प्रसिद्ध आहे.