नवी दिल्ली : बाहुबली फेम नोरा फते सध्या तिच्या या खास डान्समुळे चर्चेत आहे. नोराचा डान्स लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. तिचा हा बॅले डान्स सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे. 


4 लाखाहुन अधिक लोकांना पाहिला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोराने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. 4 दिवसात हा व्हिडिओ 4 लाखाहुन अधिक लोकांना पाहिला आहे. नोराने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, बंगळूरमध्ये मिस इंडिया फेमिना दिवा अवॉर्ड दरम्यान माझा सोलो डान्स परफॉर्मन्स कोणत्याही तयारी विना केला. फक्त म्युझिक फिल करत होते.



यापूर्वीही केला होता हा प्रयोग


यापूर्वी ही नोराने सलमानच्या स्वग से स्वागत या गाण्याच्या अरेबिक व्हर्जनवर जबरदस्त डान्स केला होता. त्याला 4,903,345 व्हिव्यूज आणि खूप प्रतिक्रीया मिळाल्या होत्या.



नोराची कला आणि सोशल मीडिया


नोरा बिग बॉस 9 मध्येही सहभागी झाली होती. अलिकडेच ती माय बर्थडे सॉन्ग मध्ये प्रमुख भूमिकेत झळकली होती. रॉकी हॅंडसम आणि बाहुबली द बिगनिंग यात अतिथी भूमिकेत दिसलेली नोरा सोशल मीडियावर आपली कला चांगली प्रकारे दर्शवते.