मुंबई : बाहुबली चित्रपटातून रातोरात स्टार बनलेल्या अभिनेता प्रभासचे जगभरात करोडो चाहते आहेत. सोशल मीडियावरील लाखो मुली प्रभासच्या प्रेमात आहेत. त्याची लोकप्रियता पाहून त्याच्या आईचेही हेच स्वप्न आहे की, या अभिनेत्याने लवकरच घरात सून आणावी.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

होय, खुद्द प्रभासने त्याच्या एका मुलाखतीत याची कबुली दिली आहे. प्रभासने सांगितले आहे की, त्याची आई  त्याच्यासोबत लग्नासाठी बरेच दिवस कसे बोलत होती.


मात्र बाहुबली चित्रपटापूर्वीपासूनच प्रभास त्याच्या आईचे म्हणणे टाळत आला आहे.  एकदा प्रभासने बाहुबली रिलीज झाल्यानंतर लग्न करणार असल्याचे वचनही आईला दिले होते, मात्र प्रभासने अद्याप हे वचन पूर्ण केलेले नाही.


प्रभासचे नाव अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. कधी निहारिका तर कधी अभिनेत्री अनुष्का शेट्टीसोबतच्या अभिनेत्याच्या रोमान्सच्या बातम्या बॉलीवूडमध्ये रंगल्या आहेत.


पण आपल्या नात्याबाबत अभिनेता कधीच उघडपणे बोलला नाही. प्रभासने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, माझी आई शिवकुमारीला मी लग्न करावे अशी खूप दिवसांपासून इच्छा होती.



माझ्या लग्नाबद्दल बोलणे माझ्या घरात सामान्य झाले आहे. माझ्या आईला मी बाबा कधी होणार याची उत्सुकता लागली आहे.