बाहुबली प्रभास या अभिनेत्रीसोबत करणार विवाह
बाहुबली या अभिनेत्रीसोबत करणार विवाह
मुंबई : बॉलिवूडमध्ये सलमान खानचा विवाह नेहमी चर्चेचा विषय असतो. त्याच प्रकारे साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये बाहुबली स्टार प्रभासचा विवाह हा चर्चेचा विषय बनला आहे. मागच्या वर्षी याच महिन्यात बाहुबली-2 रिलीज झाली होती. यानंतर प्रभास आणि अनुष्काच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. पण आता प्रभासचं नाव एका वेगळ्या अभिनेत्रीसोबत जोडलं जात आहे.
निहारिका साउथचे सुपरस्टार चिरंजीवी यांची भाची आहे. प्रभासचे कुटुंबिय त्य़ाच्यासाठी मुलगी शोधत आहेत. हे अॅरेंज मॅरेज असल्याचं बोललं जातंय. चिरंजीवीने मात्र ही गोष्ट फेटाळली आहे. चिरंजीवींनी म्हटलं की, मला नाही माहित की ही अफवा कुठून उडाली. निहारिका अजूनही लग्नासाठी लहान आहे. निहारिका तिच्या प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहेत. तेलेगु फिल्म ओका मनासुमध्ये निहारिका झळकणार आहे. अमिताभ बच्चन यांचा देखील या सिनेमामध्ये छोटा रोल असणार आहे.
प्रभासचे काका कृष्णम राजू यांनी सांगितलं की, प्रभास याच वर्षी लग्न करु शकतो. त्य़ाला याच वर्षी लग्न करण्याची इच्छा आहे. बाहुबली सिनेमानंतर प्रभासला ६००० मुलींचे प्रपोजल आले आहेत. प्रभास सध्या ‘साहो’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. श्रद्धा कपूर या सिनेमामध्ये त्याच्यासोबत दिसणार आहे. हिंदी, तमिळ, मल्याळम आणि तेलेगु भाषेमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे.