Baipan Bhari Deva Song Writer Marathi Actress: सध्या 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट चांगलाच गाजतो आहे. त्यामुळे सध्या या चित्रपटाची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यासोबत या चित्रपटातील मंगळागौर हे गाणंही तूफान गाजताना दिसत आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की हे गाणं एका लोकप्रिय अभिनेत्रीनं लिहिलं आहे. सध्या सोशल मीडियावर तिचीच चर्चा रंगलेली आहे. माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेतील शनायाची लाडकी मैत्रीण तुम्हाला आठवत असेल. हो, आम्ही त्याच अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत. ही लोकप्रिय अभिनेत्री किक्रेटर राहूल द्रविणच्या नात्यातली आहे. अभिनेत्री अदिती द्रविडनं हे गाणं लिहिलं असून या गाण्याला युट्यूबवर चक्क 10 लाख व्ह्यूज आले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर या गाण्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अदितीचे सोशल मीडियावरही अनेक फॉलोवर्स आहेत. तिच्या सोशल मीडिया पोस्टही अनेकदा चर्चेत असतात. अदितीनं अनेक लोकप्रिय मराठी मालिका आणि चित्रपटांतून अभिनय केला आहे. त्यासोबत तिला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. तिनं या गाण्याची लिंक शेअर केली आहे. ज्यात तिनं म्हटलंय की, ''मी लिहिलेलं गाणं... ऐकलं किंवा पाहिलं नसेल तर नक्की पाहा. या गाण्यानं युट्यूबवर 1 मिलियन व्हूयज पुर्ण केले आहेत. त्याचबरोबर हे गाणं अजूनही युट्यूबवर ट्रेंड करत आहे.'' त्यामुळे सध्या तिच्या या पोस्टनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या फॅन्सनाही तिच्या या गाण्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्या हे गाणंही युट्यूबवर जोरात ट्रेण्ड करताना दिसत आहे. 


'बाईपण भारी देवा' या चित्रपटातील मंगळागौर या गाण्याला तूफान प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. या गाण्यातील मंगळागौरीच्या खेळही प्रेक्षकांच्या आवडीचा आहे. हे गाणं साई-पियुष यांनी संगीतबद्ध केलं असून सावनी रवींद्र यांनी हे गाणं गायलं आहे आणि हे गाणं अभिनेत्री अदिती द्रविडनं लिहिलं असून ती या गाण्याची गीतकार आहे. अभिनेत्री  अदिती द्रविडनं 'माझ्या नवऱ्याची बायको' आणि 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या मालिकेतून तिनं अप्रतिम भुमिका केल्या आहेत. 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेतूनही प्रेक्षकांसमोर आली होती. सोबतच तिनं मराठी नाटकातूनही कामं केली आहे. 'या गोजिरवाण्यात घरात' नाटकासाठी तिला पुरस्कारही प्राप्त झाला आहे. 


हेही वाचा - चिंब भिजलेले, रूप सजलेले! 'या' मराठमोठ्या अभिनेत्रींनी लुटला पावसाचा आनंद... Photo Viral



अदितीनं पुण्यातील भारती विद्यापीठातून प्रोस्ट ग्रॅज्यूएशन केलं आहे. तिनं भरतनाट्यममधूनही एमए केलं आहे तसंच गंधर्व महाविद्यालयाच्या विशारदपर्यंतच्या परीक्षांमध्ये तिनं चांगले गुणं मिळवले आहेत. पाचवीपासून ती गुरू स्वाती दैठणकर यांच्याकडे नृत्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेते आहे.