करमाळ्यातील कलाकारांचा `बांबू` लघुचित्रपट अमेरिकेन ओटीटी प्लॅटफॉर्मवर
बांबु हा लघुचित्रपट आता अमेरिकन ओटीटी प्लॅटफॉर्मवर
करमाळा : देशातील गरीबी, भुकबळी यावर भाष्य करणारा बांबु हा लघुचित्रपट आता अमेरिकन ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे. सोलापुरच्या करमाळ्यातील होतकरु तरुणांनी बनवलेला हा लघुचित्रपट आता जगभरातील प्रेक्षकांना पाहता येणारेय. राज्यात या लघुचित्रपटाला अनेक फेस्टिव्हलमध्ये पारितोषिक मिळाल्यानंतर आता याची परदेश वारी पाहायला मिळतेय.
करमाळा तालुक्यातील राजुरी गावचा तरुण दिग्दर्शक गणेश मोरेने बी फार्मसीचे शिक्षण घेत बांबू लघुचित्रपट तयार केलाय भारतात अनेकजण आजही अन्नापासून वंचित आहेत. भारत महासत्तेच्या दिशेने जात असताना दारिद्र्य, भुकबळी हे कुठेतरी थांबल पाहीजे असा सामाजिक संदेश या लघुपटातून देण्यात आलाय.
सुशांत शिवथरेने याची कँमेराची बाजु संभाळली तर सचिन साखरे, संकेत भोसले यांनी संकलन सहाय्य केलंय. अक्षय सुरवसे शिवराज कदम यांनी यात अभिनय केलाय. भोर येथे या 'बांबू' लघुपटाचे चित्रिकरण झाले असून २४ ऑगस्टला हंगामा प्ले आणि एरटेल एक्सट्रीम या (OTT)
'ओव्हर द टॉप' प्लँटफॉर्मवर प्रसारित
पहिल्या दिवसापासुन लघुपटास सर्वाधिक पसंती मिळालेली पाहून अमेरिकेतील 'ओव्हर द टॉप' प्लँटफॉर्मर 'बांबू' दिसू लागला. यानिमित्ताने करमाळ्याच्या सांस्कृतीक क्षेत्रात मानाचा तुरा खोवला गेला आहे. हा आमचा पहीला लघुचित्रपट असुन सर्वांनी हा लघुचित्रपट नक्की पाहावा असं आवाहन दिग्दर्शक गणेश मोरे यांनी प्रेक्षकांना केलंय.