मुंबई : भारताच्या गानिकोकिळा लता मंगेशकर यांच्यानंतर डिस्को किंग बप्पी लहरी यांना आज प्रत्येकाने जड अंतःकरणाने अखेरचा निरोप दिला. 'याद आ रहा हैं...' गाण्याच्या माध्यमातून प्रेमाची आठवण करून देणारे बप्पी दा आता फक्त आपल्या आठवणीत जिवंत असतील... बप्पी दा यांचं निधन गुरूवारी झालं. त्यांच्यावर आज  पवन हंस स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कलाविश्वातील अनेक दिग्गज उपस्थित होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बप्पी दा यांचा मुलगा बाप्पा परदेशात राहतो. तो भारतात आल्यानंतर बप्पी दा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर बप्पी दा यांच्या रुपात आणखी एक दिग्गज कलाकार या कलाजगतानं गमावला. यावर बॉलिवूड आणि संगीत जगतातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


बप्पी लहरी यांनी 1970 ते 1980 दरम्यान अनेक सुपरहीट गाणी बॉलिवूडला दिली. त्यांना वेगळ्या प्रकारच्या म्युझिकमध्ये फार आवड होती. आज बॉलिवूडमध्ये डिस्को सॉन्ग्स आहेत, तर त्याचं श्रेय बप्पी दा यांना जात... असं म्हणायला हरकत नाही...


'चलते-चलते', 'शराबी' आणि 'डिस्को डान्सर' यांसारख्या अनेक गाण्यांवर फक्त बॉलिवूडकरांनी नाही, तर तुम्ही देखील ठेका धरला... त्यांनी  संगीतदिग्दर्शन, गायन यासोबतच रिऍलिटी शोसाठी परीक्षकाचीही भूमिका बजावली होती.