मुंबई : बॉलिवूडमध्ये अशी काही स्टार कपल आहेत, जी केवळ अभिनयच नाहीत तर प्रेमकथेमुळे देखील चर्चेत असतात. बॉलिवूडमध्ये सुनील दत्त आणि नर्गिस सुंदर कपल होतं. ज्यांची प्रेमकथा देखील कोणत्या चित्रपटापेक्षा कमी नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटांपूर्वी सुनील दत्त कंडक्टर म्हणून काम करायचे
सुनील दत्त यांचा जन्म पाकिस्तानच्या झेलम मध्ये झाला. वयाच्या ५व्या वर्षी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. यानंतर त्यांचं संपूर्ण कुटुंब भारतात गेलं. सुनील दत्त यांनी आयुष्याची अनेक वर्षे हरियाणामध्ये घालविली. सुनील दत्त 1955मध्ये अभिनेता होण्याचं स्वप्न पाहण्यासाठी मुंबईला आले होते, पण इथलं जीवन इतकं सोपं नव्हते. सुनील दत्त यांनी आपले जीवन जगण्यासाठी बस कंडक्टरची नोकरी केली. ते मुंबईत न्हावी आणि टेलरसोबत राहत असत.


नरगिसला पाहून सुनील सर्व काही विसरले
ज्यावेळी बॉलिवूडमध्ये नर्गिस यांनी आपले वेगळं स्थान बनवलं होतं, त्यावेळी सुनील दत्त रेडिओ जॉकी म्हणून काम करायचे. एकदा त्यांना नरगिस यांची मुलाखत घ्यावी लागली, जेव्हा नरगिस सुनील दत्त यांच्या समोर आल्या तेव्हा ते सर्व काही विसरले आणि एक शब्दही बोलू शकले नाही. यामुळे मुलाखत रद्द करावी लागली. अशाच प्रकारे दोघे पहिल्यांदा भेटले. यावेळी नरगिस राज कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होत्या.



सुनील दत्त 'मदर इंडिया'च्या सेटवर नरगिस यांच्या प्रेमात पडले.
मदर इंडिया चित्रपटामध्ये नरगिस यांनी राधाची भूमिका साकारली होती, तर सुनील दत्त राधाचा मुलगा बिरजू बनले होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नरगिस सुनील दत्त यांच्या प्रेमात पडल्या होत्या. एका सीन दरम्यान सेटवर आग लागली होती आणि नरगिस या आगीमध्ये अडकल्या होत्या. सुनील यांच्या डोळ्यासमोर त्यांचं प्रेम संकटात सापडलं होतं. त्यांनी नायकासारखी या आगीत उडी मारली आणि नर्गिस यांचा जीव वाचवला.



त्यावेळी नरगिस राज कपूरसोबत तुटलेल्या नात्यामुळे नरवस होत्या. अशा परिस्थितीत सुनील यांच्या या शौर्याने नरगिस यांचं मन जिंकलं. चित्रपट रिलीजच्या दुसर्‍याच वर्षी दोघांनी 1958 मध्ये लग्न केलं. लग्नानंतरच चित्रपटांमध्ये सुनील दत्त यांचा सुवर्णकाळ सुरू झाला. त्यांनी 'सुजाता' आणि 'साधना' सारख्या सर्वोत्कृष्ट चित्रपटात काम केलं.