मुंबई : 80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री नीलम कोठारी आजही तिच्या शानदार चित्रपट आणि सौंदर्यासाठी ओळखली जाते. ती नीलम, अग्निपथ, खतरों के खिलाडी, इल्झाम या चित्रपटांमध्ये दिसली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नीलमने सांगितले की, तिचे वडील शिशिर कोठारी यांना तिने अभिनय क्षेत्रात काम करावे असे वाटत नव्हते. ते चित्रपटात काम करण्याबाबत सहमत नव्हते. नीलमचे वडील शिशिर हे मोठे व्यापारी होते आणि त्यांचे गेल्या वर्षी निधन झाले.


1984 मध्ये आलेल्या 'जवानी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या नीलमने 2000 मध्ये फिल्म इंडस्ट्रीला राम-राम ठोकला.


नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नीलमने सांगितले आहे की, मी  चित्रपटात काम करण्याबाबत तिच्या वडिलांचा विरोध होता. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, तिला एका चित्रपटाची ऑफर आली पण तिच्यावडीलांनी ही गोष्ट अभिनेत्रीला सांगितली नव्हती, तिच्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली होती.


मात्र, अनेकवेळा चर्चा करून अखेर वडिलांनी होकार दिल्याचे नीलमचे म्हणणे आहे.मुलाखतीत नीलम म्हणाली, "मला एक ऑफर आली होती, पण अनेक महिने वडिलांनी मला याबद्दल काहीही सांगितले नाही, कदाचित त्यांच्या मनात हे स्पष्ट होते की मी चित्रपटात काम करू नये." खरंतर आमची फिल्मी पार्श्वभूमी नाही, मग एके दिवशी जेवत असताना माझ्या वडिलांनी मला सांगितलं की तुझ्यासाठी चित्रपटाची ऑफर आली आहे.


नीलमच्या म्हणण्यानुसार, ती खूप लाजाळू स्वभावाची होती, म्हणून ती लाजत तिच्या वडिलांना म्हणाली, 'बाबा, पुढच्या वेळी मी बॉम्बेला जाईन तेव्हा मी ही ऑफर स्वीकारु  का?'. यावर तिचे वडील म्हणाले, 'नाही, नाही हे अशक्य आहे, तू चित्रपटात काम करणार नाहीस'.


चित्रपट निर्माते रमेश बहल यांच्या सांगण्यावरून मुंबईला भेट देण्यासाठी आलेल्या नीलमने 'जवानी' चित्रपटासाठी लुक टेस्ट दिली होती.



इथूनच नीलमला अभिनय करावासा वाटला, सुट्टी संपवून ती बँकॉकला परतली असली, तरी काही वेळाने ती फक्त एकच चित्रपट करून बँकॉकला परत येईल, असे आश्वासन तिने कुटुंबीयांना मुंबईला येण्यापूर्वी दिले होते.