मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री डिंपल कपाडियाने वयाच्या १६ व्या वर्षी ऋषी कपूरसोबत 'बॉबी' चित्रपट साईन केला होता. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच डिंपल कपाडियाने सुपरस्टार राजेश खन्नासोबत लग्न केलं. हा चित्रपट प्रदर्शित होताच डिंपल स्टार बनली होती पण तिला तिचं स्टारडम जगण्याची संधी मिळाली नाही. डिंपलने लग्नानंतर चित्रपटात काम करावं असं राजेश खन्ना यांना वाटत नव्हतं, त्यामुळेच डिंपलने चित्रपटांपासून स्व:तला दुरावलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जसजशी वेळ निघून गेली तसतसं राजेश खन्ना यांचं स्टारडम कमी होऊ लागलं. त्यामुळे त्यांना कामाची कमतरता भासू लागली. अशा परिस्थितीत डिंपल कपाडियाने स्वतःसाठी आणि मुलांसाठी चित्रपटांमध्ये परतण्याचा निर्णय घेतला. यानंतर लगेच 'सागर' चित्रपटासाठी देखील त्यांना साईन करण्यात आलं. मात्र, हा सिनेमा बनण्यात बराच उशिर झाला होता. त्यामुळे डिंपलचा कमबॅक चित्रपट 'जख्मी शेर' ठरला. हा चित्रपट 1984 साली प्रदर्शित झाला.


दुसरीकडे राजेश खन्ना यांना डिंपल यांचं चित्रपटात काम करणं सहन होत नव्हतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजेश आणि डिंपल कपाडिया यांच्या विभक्त होण्यामागंच मुख्य कारण डिंपल यांनी चित्रपटांमध्ये काम करणं हे होतं. याशिवाय राजेश खन्ना त्यांच्या संपलेल्या स्टारडममुळे ते सतत त्रासले होते. त्यामुळे दोघांमध्ये वारंवार भांडणं देखील होत असत. डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना यांचा जरी घटस्फोट झाला नसला तरी हे दोघं वेगळे झाले होते. लग्नानंतर डिंपलने 'जख्मी शेर', 'सागर', 'दिल चाहता है', 'क्रांतिवीर', 'राम लखन', 'अजूबा', 'काश', 'अर्जुन', 'ऐतबार', 'दबंग'  हे चित्रपटांमध्ये काम केलं. 'दबंग'. 'पटियाला हाउस' सारख्या अनेक उत्तमोत्तम चित्रपटात त्यांनी काम केलं आहे.