मुंबई : असं म्हणतात जेव्हा एखादा माणूस खरं प्रेम करतो. तेव्हा त्याला समोरच्याची प्रत्येक गोष्ट आवडू लागते. असंच काहीसं अभिनेत्री आलिया भट्टसोबत घडलं आहे.  आलिया आपला स्वीटहार्ट रणबीर कपूरवर जीवापाड करते. पण तुम्हाला माहिती आहे का? की, दीपिका कतरिना आधी रणबीरचं नाव एका पाकिस्तानी अभिनेत्रीसोबतही जोडलं गेलं होतं. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून माहिरा खान आहे. या दोघांचा एक किस्साही खूप चर्चेत आला होता. आज आम्ही तुम्हाला याच किस्साबद्दल सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही वर्षांपूर्वी माहिरा खान प्रकाशझोतात आली. जेव्हा ती रणबीर कपूरसोबत न्यूयॉर्कच्या रेस्टॉरंटबाहेर सिगरेट पिताना  दिसली. या फोटोंमध्ये  माहिराला सिगारेट ओढल्याने आणि बॅकलेस ड्रेस घातल्याबद्दल सोशल मीडियावर ट्रोल केलं. यानंतर तिने दिलेल्या एका मुलाखतीत या वादावर बोलताना ती म्हणाली की, त्या फोटोंसाठी मला ज्याप्रकारे ट्रोल करण्यात आलं, हे सगळं विचार करून मला अपमानित वाटतं.


त्या फोटोंभोवती निर्माण झालेल्या वादाबद्दल बोलताना माहिरा एका शोमध्ये म्हणाली, 'माझ्या संपूर्ण कारकिर्दीत पहिल्यांदाच मला अशाप्रकारे वादात ओढलं गेलं. ही माझ्यासाठी खूप विचित्र परिस्थिती होती. साहजिकच, हे सगळं पाहून एखाद्याला अपमान वाटेल की, कोणीतरी तुमचे पर्सनल फोटो काढून ते व्हायरल करतात.



माहिरा आणि रणबीरचे हे फोटो त्यावेळचे आहेत जेव्हा रणबीर कपूर न्यूयॉर्कला संजय दत्तच्या बायोपिकच्या शूटिंगसाठी गेला होता. त्या दिवसात माहिरा खानही तिथे होती आणि माहिरा खान ज्या हॉटेलमध्ये राहात होती तिथे रणबीर कपूर तिला भेटायला आला होता. दोघंही हॉटेलमधून बाहेर आले तेव्हा या दोघांचे फोटो कॅमेऱ्यात कैद केले गेले. सोशल मीडियावरील हे फोटो आगीसारखी पसरले आहेत. एकेकाळी या दोघांच्या अफेरच्याही बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. या सगळ्यानंतर अखेर आलिया आणि रणबीर या आठवड्यात लग्नबंधनात अडकणार आहेत.