मुंबई : 'बिग बॉस' (Bigg Boss) ची स्पर्धक, गायक आणि अभिनेत्री  शहनाज गिल (Shehnaaz Gill) कायम सोशल मीडियावर ऍक्टीव्ह असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती कायम सोशल मीडिय़ावर तिचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असतेम. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहनाज गिल सलमान खानच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट शहनाजचा पहिला बॉलिवूड चित्रपट असेल आणि तोही सुपरस्टार सलमान खानसोबत. अभिनेत्री तिच्या पदार्पणाबद्दल खूप उत्सुक आहे. पण यावेळी तिच्या चाहत्यांना अजून एक मोठी गुडन्यूज दिली आहे. कारण शहनाज गिलचा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच एका मोठ्या निर्मात्याने तिला दुसऱ्या चित्रपटासाठी ऑफर दिली आहे.


प्रसिद्ध बॉलिवूड निर्माता निखिल अडवाणी यांच्या नवीन चित्रपटात शहनाज गिल काम करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. हा चित्रपट महिलांवर आधारित असेल, ज्यामध्ये पाच महिला आहेत आणि त्यांच्या वेगवेगळ्या कथा आहेत. या चित्रपटात वाणी कपूर देखील दिसणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण गेल्या वर्षी सुरू होणार होतं, मात्र हवामानाच्या समस्येमुळे ते यावर्षी मार्चमध्ये सुरू होणार आहे.


शहनाज गिल तिच्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेत असल्याचं सांगण्यात येत आहे. मिताक्षरा कुमार या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. सध्या ती संजय लीला भन्साली यांच्या 'हिरामंडी' या वेबसिरीजमध्ये व्यस्त आहे. यापूर्वी मिताक्षराने संजय लीला भन्साळी यांना 'बाजीराव मस्तानी' आणि 'पद्मावत'मध्ये असिस्ट केलं आहे.


अभिनेता सलमान खान स्टारर 'कभी ईद कभी दिवाली' सिनेमामध्ये शहनाज मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शहनाज बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्यामुळे चाहते तिला मोठ्या पडद्यावर पाहाण्यासाठी सज्ज झाले आहेत.  सोशल मीडियावर देखील शहनाजच्या नावाची चर्चा रंगलेली असते. कायम आपल्या खोडकर स्वभावामुळे चर्चेत असणारी शहनाज आता परफेक्ट फिगरमुळे देखील चर्चेत असते.