मुंबई : नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने अभिनेता अरमान कोहलीच्या मुंबईतील घरावर नुकताच छापा टाकला. ड्रग्स पेडलरशी संबंध असल्याच्या आरोपावरून त्याच्या घरावर हा छापा टाकण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री एका ड्रग्स विक्रेत्याला एनसीबीने पकडलं. त्याची चौकशी केल्यानंतर मिळालेल्या पुराव्यांच्या आधारावर हा छापा टाकण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या तपासाने अनेक अभिनेत्यांना आपल्या कचाट्यात घेतलं आहे. आता एनसीबीने अभिनेता अरमान कोहलीच्या घरावर छापा टाकला आहे. यापूर्वी एनसीबीने टीव्ही अभिनेता गौरव दीक्षितच्या घरातून एमडी आणि चरस सारखे अंमली पदार्थ जप्त केले होते. गौरव दीक्षितला न्यायालयात हजर करण्यात आलं. त्याला 30 ऑगस्टपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे.


अरमान कोहलीला वादांचा मोठा इतिहास आहे. त्याच्यावर लिव्ह-इन पार्टनरसोबत शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप होता. 2018 मध्ये, त्याच्या लिव्ह-इन-पार्टनरने तिच्यावर अरमानने अत्याचर केल्याचं म्हटलं होतं. डोक्याला झालेली दुखापत दाखवत अरमानने केलेल्या अत्याचाराबद्दल उघडपणे सांगितलं होतं. नीरूने अरमान कोहलीविरुद्ध पोलीस केस देखील केली होती.


एनसीबी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, टीम अभिनेता अरमान कोहलीच्या मुंबईतील निवासस्थानी छापा टाकत आहे. त्याचबरोबर, असे सांगितलं जात आहे की, ड्रम पेडलरशी संबंध असल्याच्या आरोपावरून अरमान कोहलीच्या घरी हा छापा टाकण्यात आला आहे. समीर वानखेडेंच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. दुश्मन जमाना,  बाजीगर, दिलवाले दुल्हनीया ले जायेंगे या सारख्या बड्या सिनेमात अरमानने महत्वाच्या भूमिका निभावल्या आहेत. याचबरोबर तो बिग बॉसच्या सातव्या सीझनमध्ये देखील सहभागी झाला होता.