लग्नाआधी `या` अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती काजोल, करण जोहरने केला खुलासा
बॉलिवूड अभिनेता अजय देवगनसोबत लग्न करण्याआधी अभिनेत्री काजोलचा दुसऱ्या अभिनेत्यावर प्रेम होते असा खुलासा करण जोहरने केला आहे. कोण आहे तो अभिनेता? जाणून घ्या सविस्त
Kajol Devgan : बॉलिवूड अभिनेत्री काजोल ही 90 च्या दशकातील सुपरस्टार अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्रीने अभिनय कौशल्य आणि स्वभावाच्या जोरावर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये नाव कमावलं आहे. अभिनयातून अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. अभिनेत्रीने आपल्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अनेक चित्रपटांमध्ये अभिनेत्रीने वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे.
काजोल 'या' अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती
अभिनेत्री काजोल ही नेहमी तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफमुळे देखील खूप चर्चेत असते. अभिनेत्री काही वैयक्तिक किस्से देखील आजही सोशल मीडियावर चर्चेत आहेत. 1999 मध्ये काजोलने अजय देवगनसोबत लग्न केले. अजय देवगनसोबत लग्न करण्याआधी काजोलचा दुसऱ्या अभिनेत्यावर क्रश होता. काजोलच्या मनातील हा अभिनेता कोण होता जाणून घ्या सविस्तर
करण जोहरने केला मोठा खुलासा
अजय देवगन आणि काजोल हे एकमेकांसोबत काम करत असताना एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर काजोलने 1999 मध्ये अजय देवगनसोबत लग्न केले. सध्या या जोडप्याला न्यासा आणि युग ही दोन मुले आहेत. मात्र, अजय देवगनसोबत लग्न करण्याआधी काजोलचे दुसऱ्या अभिनेत्यावर प्रेम होते. याचा खुलासा काजोलचा जवळचा मित्र आणि दिग्दर्शक करण जौहरने केला होता. करण जोहरने काजोलच्या क्रशबाबत मोठा खुलासा केला आहे. ज्यामुळे सगळेच आश्चर्यचकित झाले होते.
करण जोहर आणि काजोल हे दोघे कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचले होते. दरम्यान, अजय देवगनसोबत लग्नाआधी काजोलचा अक्षय कुमारवर क्रश होता. असा खुलासा करण जोहरने केला होता. करण जोहरने काजोलबाबत खुलासा करताना म्हटले होते की, जेव्हा हिना चित्रपटाचा प्रीमियर झाला तेव्हा काजोलचा अक्षय कुमारवर क्रश होता. मला आठवतंय की ती संपूर्ण प्रीमियरमध्ये अक्षय कुमारला शोधत होती. त्यामुळे मी तिला यासाठी मदत करू लागलो. त्यावेळी मी देखील या प्रीमियरमध्ये अक्षय कुमारला शोधत होतो. असं करण जोहर म्हणाला.
अक्षय कुमार आणि काजोल 'या' चित्रपटात एकत्र
अभिनेत्री काजोलला तिच्या करिअरमध्ये क्रशसोबत काम करण्याची एक संधी मिळाली होती. आतापर्यंतच्या करिअरमध्ये काजोल आणि अक्षय कुमारने फक्त एकाच चित्रपटात काम केलं आहे. काजोल आणि अक्षय कुमार यांनी 1994 मध्ये 'ये दिल्लगी' या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. यानंतर दोघांना एकत्र काम करण्याची संधी मिळाली नाही.